मुक्तपीठ टीम
भारतीय जनता पक्षाचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा दिल्लीत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शर्मा यांच्या मृत्यूमुळे भाजपाने आजची संसदीय पक्षाची बैठक रद्द केली आहे.
हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून येत असत. दिल्ली शर्मा यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयाजवळ खासदार निवासस्थान आहे. त्या निवासस्थानातच त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. शर्मा यांच्या मृत्यूमागचं नेमके कारण मा्त्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांना सकाळी ८.३० वाजल्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
रामस्वरुप शर्मा…संघ ते संसद!
- खासदार रामस्वरुप शर्मा हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्याचे रहिवाशी होते.
- ते दीर्घकाळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सहभागी होते.
- ते मंडी जिल्हा भाजपचे सचिव आणि त्यानंतर
- हिमाचल प्रदेश भाजप सचिव म्हणून कार्यरत होते.
- त्यांनी ‘हिमाचल फूड अॅन्ड सिव्हिल सप्लाय कॉर्पोरेशन’चं अध्यक्षपदाची जबबादारीही सांभाळली होती.
- २०१४ साली रामस्वरुप शर्मा भाजपाकडून पहिल्यांदा मंडी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
- काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांना जवळपास ४० हजार मतांच्या फरकानं शर्मा यांनी पराभूत केले होते.
- २०१९ सालीही रामस्वरुप शर्मा यांना मंडी लोकसभा मतदारसंघातूनच पुन्हा लोकसभेवर निवडून आले होते.