Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंबानी स्फोटके प्रकरणातील ‘ती’ मर्सिडिझ कुणाची?

March 16, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
mansukh hiren

मुक्तपीठ टीम

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आणि मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणातले दररोजच गौप्यस्फोट होत आहे. २२ फेब्रुवारी रोजी रात्री मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ सापडली. स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या वीस कांड्या होत्या. या भागातील सीसीटीव्हीचा तापस करण्यात आला तेव्हा दोन गाड्यांचा उल्लेख समोर आला होता, त्यात पहिली स्कॉर्पिओ आणि दुसरी इनोव्हा होती. मात्र, एनआयएच्या चौकशीत तिसर्‍या कारचीही चौकशी सुरू आहे. ही तिसरी कार मर्सिडिझ होती, ती नेमकी कुणाची याचा आता एनआयए शोध घेत आहे.

मर्सिडीजच्या शोधात तपास पथक

  • मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओच्या तपासात मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे.
  • या प्रकरणातील एनआयएची चौकशी जसजशी सुरू आहे तसतसे नवीन गोष्टीही समोर येत आहेत.
  • सूत्रांच्या माहितीनुसार सचिन वाझे प्रकरणातील इनोव्हा कारची माहिती मिळाल्यानंतर एनआयए आता मर्सिडीज कारचीही चौकशी करत आहे.
  • असे म्हटले जात आहे की ही मर्सिडीज कारही तपासणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते

मनुसख कुणाच्या मर्सिडिझमधून गेले?

  • एनआयएला मर्सिडीज कारचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहेत.
  • हे सीसीटीव्ही फुटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरचे असल्याचे समजते.
  • या मर्सिडीजमध्ये स्कॉर्पिओचे दिवंगत मालक मनसुख हिरेन बसले होते.
  • सीसीटीव्हीकडे पाहून असं वाटतंय की मनसुख कुणाची तरी वाट पहात होता. तेवढ्यात एक मर्सिडीज कार आली आणि मनसुख त्यात बसून निघून गेला. मनसुख बेपत्ता झालेल्या वेळीचा हा सीसीटीव्ही फुटेज असू शकतो असा एनआयएचा संशय आहे.

मर्सिडीझमुळे होणार धक्कादायक गौप्यस्फोट?

  • मनसुख हिरेन त्या दिवशी कोणाबरोबर गेला होता? ती गाडी कोणाची होती? एनआयए आता या सर्व बाबींचा तपास करत आहे.
  • मर्सिडीज सापडल्यानंतर मनसुख हिरेन प्रकरणात इतर कोणते लोक सामील आहेत? हे देखील कळेल.
  • सचिन वाझे यांना या प्रकरणात प्याद म्हणून वापरण्यात आले आहे का, तेही स्पष्ट होण्यास मदत होईल.
  • या प्रकरणात इतर बरीच मोठी माणसे गुंतलेली असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मर्सिडीजच्या चौकशीनंतर आणखी महत्त्वपूर्ण गौप्यस्फोट अपेक्षित केले जात आहेत.

Tags: mercedes carmukesh ambanisachin vazeमनसुख हिरेनमर्सिडिझमुकेश अंबानीसचिन वाझेस्कॉर्पिओ कार
Previous Post

सचिन वाझेंचं निमित्त…किरीट सोमय्यांकडून पवार-ठाकरे लक्ष्य!

Next Post

१६ हजार ५०० कोटींचे चेक क्लिअर झाले नाहीत! बँक संपाचा फटका

Next Post
bank strike

१६ हजार ५०० कोटींचे चेक क्लिअर झाले नाहीत! बँक संपाचा फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!