मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या २४ तासातील नव्या रुग्णांची संख्या ५००पेक्षा जास्त असणाऱ्या सुपर हॉटस्पॉट्समध्ये आजही स्थिती चिंताजनकच आहे. पुणे जिल्हा, नागपूर जिल्हा, मुंबई, ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, औरंगाबाद जिल्हा या सहा सुपर हॉटस्पॉट्समध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जळगावमध्ये रुग्णसंख्यावाढ कालपेक्षा कमी झाली. बुलढाणा या जिल्ह्यातील आजची नव्या रुग्णांची संख्या घटताना दिसली. बुलढाणा या जिल्ह्यात काल ५३५ नवे रुग्ण सापडले होते, आज तेथे रुग्णसंख्या २०१ने कमी झाली. आज तेथे ३३४ नव्या रुग्णांचे निदान झाले. आजची रुग्णवाढ ५००पेक्षा कमी असल्याने तो जिल्हा सुपर हॉटस्पॉटच्या यादीतून आज बाहेर आहे.
महाराष्ट्रातील सुपर हॉटस्पॉट्स
१)पुणे जिल्हा एकूण ३,२५९
- पुणे ०६७३
- पुणे मनपा १७८०
- पिंपरी चिंचवड मनपा ०८०६
२)नागपूर जिल्हा एकूण २,३५३
- नागपूर ०३७७
- नागपूर मनपा १,९७६
३)मुंबई मनपा १,९६३
(शहरे + उपनगरे २ जिल्हे)
४)ठाणे जिल्हा एकूण १,३४८
- ठाणे ०२१६
- ठाणे मनपा ०३५६
- नवी मुंबई मनपा ०२२४
- कल्याण डोंबवली मनपा ०४१७
- उल्हासनगर मनपा ००३७
- भिवंडी निजामपूर मनपा ००१९
- मीरा भाईंदर मनपा ००७९
५)नाशिक जिल्हा एकूण १,३४४
- नाशिक ०३२९
- नाशिक मनपा ०९४६
- मालेगाव मनपा ००६९
६)औरंगाबाद जिल्हा एकूण ०९०३
- औरंगाबाद ०१५१
- औरंगाबाद मनपा ०७५२
७)जळगाव जिल्हा एकूण ०५८४
- जळगाव ०३३८
- जळगाव मनपा ०२४६