मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात आजही कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. गेल्या २४ तासात राज्यात १५,६०२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४८ तासात ४० मृत्यूंची नोंद झाली आहे. आजही महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर नागपूर आणि मुंबई आहे. नाशिक, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, बुलढाणा या पाच जिल्ह्यांमधील कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे चिंताजनक आहे. त्याचवेळी राज्यात साडे सात हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १,१८,५२५ वर पोहचली आहे.
राज्यातील कोरोना संसर्ग आकड्यांमध्ये
- आज राज्यात १५,६०२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ७,४६७ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज रोजी एकूण १,१८,५२५ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २१,२५,२११ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.४९% एवढे झाले आहे.
- आज नोंद झालेल्या एकूण ८८ मृत्यूंपैकी ४० मृत्यू हे मागील ४८ तासातील
- २१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.३ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७४,०८,५०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,९७,७९३ (१३.२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,७०,६९५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,०३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना सुपर हॉटस्पॉट्स
१)पुणे जिल्हा एकूण ३,०६६
- पुणे ६२६
- पुणे मनपा १६६७
- पिंपरी चिंचवड मनपा ७७३
२)नागपूर जिल्हा एकूण २२७९
- नागपूर ४५१
- नागपूर मनपा १८२८
३)मुंबई मनपा १७०९
४)नाशिक जिल्हा एकूण ११९२
- नाशिक ३४८
- नाशिक मनपा ६६०
- मालेगाव मनपा ८४
५)ठाणे जिल्हा एकूण ११७४
- ठाणे १०८
- ठाणे मनपा ३३८
- नवी मुंबई मनपा १९६
- कल्याण डोंबवली मनपा ४१९
- उल्हासनगर मनपा ३४
- भिवंडी निजामपूर मनपा १४
- मीरा भाईंदर मनपा ६५
६)औरंगाबाद जिल्हा एकूण ७७१
- औरंगाबाद १८०
- औरंगाबाद मनपा ५९१
७)जळगाव जिल्हा एकूण ७१२
- जळगाव ४३२
- जळगाव मनपा २८०
८)बुलढाणा जिल्हा एकूण ५३५
महानगर-जिल्ह्यांनुसार कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १५,६०२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,९७,७९३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा १७०९
- ठाणे १०८
- ठाणे मनपा ३३८
- नवी मुंबई मनपा १९६
- कल्याण डोंबवली मनपा ४१९
- उल्हासनगर मनपा ३४
- भिवंडी निजामपूर मनपा १४
- मीरा भाईंदर मनपा ६५
- पालघर ४१
- वसईविरार मनपा ४६
- रायगड ७८
- पनवेल मनपा १५०
- नाशिक ३४८
- नाशिक मनपा ६६०
- मालेगाव मनपा ८४
- अहमदनगर ३४१
- अहमदनगर मनपा ९९
- धुळे ७६
- धुळे मनपा १२०
- जळगाव ४३२
- जळगाव मनपा २८०
- नंदूरबार २०७
- पुणे ६२६
- पुणे मनपा १६६७
- पिंपरी चिंचवड मनपा ७७३
- सोलापूर १११
- सोलापूर मनपा ७४
- सातारा ११४
- कोल्हापूर १८
- कोल्हापूर मनपा २४
- सांगली ३०
- सांगली मिरज कुपवाड मनपा २३
- सिंधुदुर्ग ६
- रत्नागिरी २०
- औरंगाबाद १८०
- औरंगाबाद मनपा ५९१
- जालना १७४
- हिंगोली ६१
- परभणी ३१
- परभणी मनपा २३
- लातूर ४७
- लातूर मनपा ६१
- उस्मानाबाद ३७
- बीड १८३
- नांदेड १०७
- नांदेड मनपा ३०३
- अकोला १३८
- अकोला मनपा २४०
- अमरावती २०२
- अमरावती मनपा २२५
- यवतमाळ २८३
- बुलढाणा ५३५
- वाशिम १६०
- नागपूर ४५१
- नागपूर मनपा १८२८
- वर्धा २३५
- भंडारा ६६
- गोंदिया १५
- चंद्रपूर ४१
- चंद्रपूर मनपा ३०
- गडचिरोली २४
इतर राज्ये /देश ०
एकूण १५६०२
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ८८ मृत्यूंपैकी ४० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २७ मृत्यू पुणे-८, नागपूर-८, रायगड-४, परभणी-२, रत्नागिरी-२, ठाणे-२ आणि वर्धा-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १३ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.