मुक्तपीठ टीम
गुगल आपला नेक्स्ट जनरेशन पिक्सल ५ए हा ११ जूनला लॉन्च करण्याची शक्यता आहे. गुगल पिक्सल ५ए ला लॉन्च करण्यासाठी तयारी करत आहे. या फोनमध्ये पंच होल्ड डिस्प्ले सोबत कमी बेझल स्क्रीन मिळू शकते. तसेच यात ६.२-इंच एफएचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले मिळेल.
लेटेस्ट स्मार्टफोन पिक्सल ५ए हा ५जी च्या फिचर्स पेक्षा कमी असू शकतो. तसेच समोर आलेल्या काही फोटोस् मधून याचे डायमेंशन १५६.२x७३.२x८.८ एमएम असू शकते.कोरोना महामारीमुळे गुगलने याची लॉन्चींग डेट बऱ्याचदा पुढे ढकलली आहे.
गुगल पिक्सल ५ए चे फिचर्स:
गुगल पिक्सल ५ए सोबत कंपनी आपली नेक्स्ट अँडरॉइड ऑपरेटिंग सिस्टीमचीही घोषणा करू शकते. अँडरॉइड-१२ च्या बिटा वर्जनच्या बाबतीत आधीच काही माहिती बाहेर आली आहे. वर्षाच्या शेवटी गुगल पिक्सल ६ सीरिज लॉन्च केली जाऊ शकते. पिक्सल ६ सीरिजमध्ये सेंट्रली अलाइट पंच होल कॅमेरा दिला जाऊ शकतो.