मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत. एकीकडे लोकांना बेड्स, आक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळत नसताना, नागपूरमधील ८५ वर्षांच्या चॉकलेट काकांनी एका तरुणाला वाचवण्यासाठी आपल्याला मिळत असलेला बेड आणि त्यामुळे नंतर जगही सोडले आहे. नारायण भाऊराव दाभाडकर हे मुलांना चॉकलेट वाटत असत त्यामुळे चॉकलेट काका म्हणून लोकप्रिय होते. तसेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे होते. त्यांच्या या बेडत्यागाबद्दलच्या दाव्यावर आक्षेप घेतले जात आहेत. तशा अनेक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
त्यांच्या कुटुंबियांनी खूप धडपड करून मिळवलेला रुग्णालयातील बेड नारायण भाऊराव दाभाडकर यांनी ज्याच्यासाठी सोडला तो रुग्ण परिचयाचाही नव्हता. ते दाखल होते, तेथे एक महिला ४० वर्षांच्या पतीसह पोहोचली. परंतु बेड उपलब्ध नसल्याने रुग्णालयाने दाखल करण्यास नकार दिला. महिला डॉक्टरांकडे विनंती करत होती. ते कळल्यावर नारायण दाभाडकरांनी त्यांना मिळत असलेला बेड सोडण्याचा निर्णय घेतला.
दाभाडकर यांनी रुग्णालय प्रशासनाला आपल्यासाठी मिळालेला बेड त्या महिलेच्या पतीला देण्याची विनंती केली. ते म्हणाले, “मी माझे आयुष्य जगलो आहे. मी आता ८५ वर्षांचा आहे. या महिलेचा नवरा तरुण आहे. त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्याला माझा बेड द्यावा.”
दाभाडकर ऐकण्यासच तयार नसल्यने अखेर विनंती मान्य करून रुग्णालय प्रशासनाने त्यांना सोडले. त्यांनी एका पेपरवर लिहिले की, “मी स्वेच्छेने दुसर्या रूग्णासाठी माझे बेड सोडत आहे.”
दाभडकर हे मुलांचे चॉकलेट काका
त्यांच्या कुटुंबियातील शिवानी दानी-वाखरे यांनी सांगितले की, दाभडकर मुलांना चॉकलेट देत असत. म्हणूनच मुले त्यांना चॉकलेट चाचा म्हणत असत.
दाभाडकर संघाचे स्वयंसेवक, शिवराज चौहाणांचीही श्रद्धांजली
- नारायण भाऊराव दाभाडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झाले होते.
- त्या संस्कारातूनच त्यांनी सेवेच्या यज्ञात जीवनाच्या समिधा समर्पित केल्या, असे सांगितले जाते.
- मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहाण यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
“मैं 85 वर्ष का हो चुका हूँ, जीवन देख लिया है, लेकिन अगर उस स्त्री का पति मर गया तो बच्चे अनाथ हो जायेंगे, इसलिए मेरा कर्तव्य है कि मैं उस व्यक्ति के प्राण बचाऊं।” ऐसा कह कर कोरोना पीडित @RSSorg के स्वयंसेवक श्री नारायण जी ने अपना बेड उस मरीज़ को दे दिया। pic.twitter.com/gxmmcGtBiE
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 27, 2021
दाभाडकरांचे अखेरचे दिवस
- काही दिवसांपूर्वी दाभडकरांना कोरोनाची लागण झाली होती.
- त्याचे ऑक्सिजन पातळी ६० वर घसरली होती.
- त्यांचे जावई आणि मुलगी त्यांना इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. तिथे बरीच मेहनत केल्यानंतर त्यांना बेड मिळाला.
- पण एका तरुण माणसाला बेड मिळावा म्हणून दाभाडकर रूग्णालयातून घरी परत आले.
- रुग्णालयातून घरी परतल्यानंतर तीन दिवसांनी त्यांचे निधन
नागपूरमधील दाभाडकरांच्या तरुणाला वाचवण्यासाठीचा ‘बेड’त्याग आता वादाच्या भोवऱ्यात
नागपूरमधील नारायण दाभाडकर या ज्येष्ठ संघ स्वयंसेवकाने एका तरुणासाठी त्यांना मिळणार असलेल्या बेडचा त्याग केला. त्यांनी त्या तरुणाचे जीवन वाचवले आणि तीन दिवसांनी त्यांचा घरीच मृत्यू ओढवला, अशी बातमी कालपासून सगळीकडे आली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यासह अनेकांनी त्यांच्या त्यागाचा गौरव करत श्रद्धांजली अर्पण केली होती. मात्र, आता त्यांनी बेडचा त्याग केल्याच्या दाव्यावरून वाद निर्माण झाला आहे. तो दावाच खोटा असल्याचा प्रतिदावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर काही आक्षेपाचे मुद्दे मांडणाऱ्या पोस्ट फिरू लागल्या आहेत.
- नारायण दाभाडकर यांची ऑक्सिजन पातळी ५५ वर घसरल्याचा दावा काही ठिकाणी केला गेला आहे. मग ते शुद्धीवर कसे?
- त्या अवस्थेत ते अत्यवस्थ असतील. तरीही त्यांचा तो निर्णय कुटुंबाने कसा मान्य केला?
- वैद्यकशास्त्रानुसार अशा अत्यवस्थ रुग्णाला घरी जाण्याची परवानगी कशी दिली गेली?
- कोणत्याही कोरोना रुग्णाला कोरोना बरा झालेला नसताना रुग्णालयाबाहेर जाऊ देता येते का?
- एकीकडे हे प्रश्न व्हायरल होत असतानाच आणखी एक ऑडिओ क्लिपही व्हायरल होत आहे. नंतर ती ट्विट करणारे अकाऊंटच नाहीसे झाले.
दाभडकर कुटुंब याबाबतीत अधिकृत भूमिका मांडणार असून सध्या ते काही बोललेले नाही, असे सांगण्यात आले आहे. तसेच ते रुग्णालयात गेले तेव्हा दाखल झालेच नव्हते, त्यामुळे त्यांनी बेडचा त्याग केला तो त्यांना मिळणार असलेल्या बेडचा, आयसीयूमध्ये दाखल असताना ते बाहेर आले नाही, असे सांगण्यात आले.