मुक्तपीठ टीम
मुंबईतल्या एका ८३ वर्षीय वृद्धासोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. या वृद्ध आजोबांनी पॉर्न वेबसाइट सुरु केली असता त्याला पोलिसांच्या नावाखाली ३२ हजार रुपयांचा फटका बसला आहे. संबंधित घटना २९ ऑक्टोबर रोजी साधारण रात्री १२च्या सुमारास घडली आहे. पीडित वांद्रे येथील बॅन्डस्टँड परिसरात राहतो.
नेमकं प्रकरण काय?
- वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
- पीडित वृद्धाचा स्वतःचा व्यवसाय आहे.
- रात्रीच्या सुमारास त्यांनी पॉर्न वेबसाइट सुरु केली असताना त्यांच्या कॉम्पुटरच्या स्क्रिनवर एक मेसेज आला.
- त्यामध्ये पोलिसांचा मोनोग्राम होता.
- त्याचबरोबर त्या मेसेजमध्ये पॉर्न फिल्म पाहणं बेकायदेशीर आहे आणि त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
- २४ तासांच्या आत २९,००० रुपये भरा नाहीतर तुम्हाला अटक होऊ शकते, असं म्हटलं होतं.
- मेसेज आल्यानंतर वृद्ध व्यक्तीने तातडीने पैसे भरले. मात्र, त्यानंतर बँकेत गेल्यानंतर हे पैसे पोलिसांच्या नावावर न जाता दुसऱ्याच कोणत्यातरी व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याचं निदर्शनास आलं.
या संपूर्ण घटनेची माहिती वृद्धाने पोलिसांनी दिली आहे. वृद्धाने पाठवलेल्या रक्कम पाठवलेल्या अकाउंटची माहिती पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.अटकेच्या भितीने मी तातडीने ३२, ००० रुपये भरुन टाकले. त्यासाठी मी डेबिट कार्डचा वापर केला होता.
मात्र, त्यानंतर माझी फसवणूक झाली असल्याचं माझ्या लक्षात आलं. तेव्हा मी तातडीने पोलिस ठाणे गाठल्याचं वृ्द्ध म्हणाला…