Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंधेरीतील महिलेचे मारेकरी जेरबंद, पण कारण काय?

अकरा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या दोन संशयितांना अटक व कोठडी

January 11, 2021
in कायदा-पोलीस
0
75 old women murder case

अंधेरीतील गुलाबी नारायण शेट्टी या ७५ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात अखेर डी. एन नगर पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत गेल्या अकरा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. रशेदुल जोहाद शेख आणि नूरअली अब्दुल सत्तार अशी या दोघांची नावे असून ते दोघेही वांद्रे येथील शास्त्रीनगरचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवार १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांना अलीकडेच वांद्रे पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्यांत अटक केली होती, त्यांच्या चौकशीत या हत्येचा पर्दाफाश झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्‍वर गणमे यांनी दुजोरा दिला आहे. दोन्ही आरोपींची चौकशी सुरु असून या चौकशीनंतरच हत्येमागील कारणाचा खुलासा होईल असे सांगितले.

 

गुलाबी शेट्टी ही महिला अंधेरीतील वालिया कॉलेजसमोरील गणेश मंदिरावरील पहिल्या मजल्यावर राहत होती. तिला एक विवाहीत मुलगी असून ती अंधेरीतील चार बंगला परिसरात राहते. या दोघांमध्ये वाद असून या वादामुळे ते एकमेकांच्या संपर्कात नव्हत्या. याच परिसरात गुलाबी यांची साडेतीन ते चार चौ. फुटाची एक जागा असून या जागेत एक हॉटेल, झेरॉक्स सेंटर आहे. त्यांच्या मालकाकडून त्यांना दरमाह सव्वादोन लाख रुपये भाडा मिळत होता. तिचे पती नारायण शेट्टी यांचा पूर्वी दारुचा व्यवसाय होता, या व्यवसायात गुलाबी यादेखील त्यांना मदत करीत होत्या. मात्र १९७५ साली त्यांची याच व्यवसायातून हत्या झाली होती. तेव्हापासून त्या एकट्याच तिथे राहत होत्या. त्यांची भाची सुजाता पुरंदर शेट्टी ही अंधेरीतील आंबोली, जय भवानी माता रोडवर राहते. तिने २४ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी तीन वाजता त्यांना फोन केला होता. मात्र त्यांनी फोन घेतला नाही. वारंवार फोन केल्यांनतर त्या फोन घेत नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्या त्यांच्या घरी आल्या होत्या. यावेळी त्यांना गुलाबी यांचे हातपाय बांधलेले आणि साडीने गळा आवळून हत्या केल्याचे दिसून आले. त्यांचा मृतदेह बाथरुममध्ये पडला होता.

 

ही माहिती मिळताच डी. एन. नगर पोलिसांसह वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. पोलिसांना घटनास्थळी काहीच संशयास्पद वस्तू सापडली नाही. प्राथमिक तपासात गुलाबी यांचे हातपाय बांधून नंतर साडीने गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह मारेकर्‍याने बाथरुममध्ये टाकून पलायन केले होते. याप्रकरणी सुजाता शेट्टी हिने दिलेल्या जबानीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे.

 

घरातील काही रोख रक्कम आणि दागिने चोरीस गेल्याचा संशय आहे, मात्र किती रुपयांचा ऐवज चोरीस गेला याचा तपशील समजू शकला नव्हता. घरात जबदस्तीने प्रवेश केल्याच्या कुठलाही प्रकार समोर आला नव्हते. त्यामुळे मारेकरी गुलाबी यांच्या परिचित असावेत असा पोलिसांचा अंदाज होता. विशेष म्हणजे गुलाबी यांच्या घरासमोरच वर्सोवा पोलीस ठाणे आहे, ही हत्या रविवारी दुपारी ते रात्री पावणेअकराच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे. गुलाबी यांची या परिसरात मोठी प्रॉपटी होती, ही प्रॉपटी विकत घेण्यासाठी एक बिल्डर इच्छुक होता, त्यासाठी त्यांनी त्यांना २५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती, त्यातून ही हत्या झाली का याचाही पोलिसांकडून तपास झाला होता. गेल्या अकरा महिन्यांपासून पोलीस आरोपींचा शोध घेत होते, याच दरम्यान वांद्रे पोलिसांनी रशेदुल जोहाद शेख आणि नूरअली अब्दुल सत्तार या दोघांना घरफोडीच्या गुन्ह्यांत या दोघांना अटक केली होती. या चौकशीदरम्यान त्यांनी गुलाबी शेट्टी यांच्या हत्येची कबुली दिली होती. या कबुलीनंतर ही माहिती डी. एन नगर पोलिसांना देण्यात आली होती, शनिवारी या दोघांचा पोलिसांनी ताबा घेऊन त्यांना हत्येच्या गुन्ह्यांत अटक केली होती, याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची आता पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.


Tags: muktpeethmurder casePoliceपोलीसमुक्तपीठ
Previous Post

अमानुषतेचा अतिरेक! दापोलीत ९० वर्षांच्या आजीवर बलात्कार!!

Next Post

भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी बहिणीचा हनी ट्रॅप

Next Post
aarey aropi photo

भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी बहिणीचा हनी ट्रॅप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!