मुक्तपीठ टीम
आज समस्त भारतीयांच्या जीवनातील महत्वाचा दिवस. मराठी माणसांसाठी तर अभिमानाचा दिवस. आजचा दिवस देशाला संविधान देणाऱ्या संविधाननिर्मात्यांचा जयंतीचा. भारतातील प्रत्येक माणसाला माणसासारखं जगण्याचा अधिकार समानतेनं देणाऱ्या महामानवाचा जन्म आजचाच. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लातुरात त्यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
#DrBabasahebAmbedkarJayanti #लातूर #BJPLatur (3/3) pic.twitter.com/SHLjc8DxQ9
— Sudhakar Shrangare (@mpsshrangare) April 14, 2022
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा तब्बल ७० फूट उंचीचा आहे. ज्ञानयोगी, प्रकांडपंडित असणाऱ्या बाबासाहेबांच्या या महापुतळ्याला‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ असे सार्थ नाव देण्यात आले आहे. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री संजय बनसोडे तसेच केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले भाजपा नेते गिरीश महाजन यांची मुख्य उपस्थिती होती. अनावर करताना लक्षवेधी आतिषबाजी करण्यात आली. तसेच लेझर शो सादर करण्यात आला.
लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा उभारण्यात आला आहे. भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकरांसह अनेक कार्यकर्ते त्यासाठी मेहनत घेत होते. अवघ्या एक महिन्यात सर्वांनीच टीमवर्कने जबाबदारी पार पाडली. पन्नास कारागिरांनी सतत २० दिवस अथक परिश्रम केले. पुतळ्याचा संकल्प प्रत्यक्षात साकारला.
कुठे आहे नॉलेज ऑफ स्टॅच्यू?
- बाबासाहेबांचा हा नॉलेज ऑफ स्टॅच्यू लातूरमध्ये उभारण्यात आला आहे.
- लातूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क या मध्यवर्ती ठिकाणी हा महापुतळा आहे.
- राज्यातील सर्वात उंच पुतळा म्हणून याची नोंद होणार आहे.
- हा पुतळा तयार करण्यासाठी १४०० किलो स्टील, १४०० किलो पीओपी, ३५७० किलो फायबर आणि २०० लिटर रंग एवढे साहित्य वापरण्यात आले आहे.