Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यात ६३० कोटींच्या बनावट पावत्यांद्वारे करचोरी करणाऱ्यास अटक

November 18, 2022
in घडलं-बिघडलं
0
GST fake Invoice

मुक्तपीठ टीम

राज्याच्या वस्तू व सेवाकर विभागाने विशेष तपास मोहिमेंतर्गत पुण्यात मोठी कारवाई केली आहे. या तपास मोहिमेत एका व्यक्तीला ६३० कोटी रुपयांच्या बनावट पावत्याद्वारे ११० कोटी रुपयांची बनावट कर क्रेडिट वापरुन पास केल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती, राज्यकर सहआयुक्त, पुणे यांनी प्रसिद्ध‍ीपत्रकाद्वारे दिली आहे.            

महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर विभागाने कर चुकविणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात राबविण्यात आलेल्या विशेष तपास मोहिमेंतर्गत पुण्यातील मेसर्स अग्रवाल एंटरप्रायझेस आणि इतर कंपन्यांच्या बाबतीत तपासणी करण्यात आली. या तपासात रामनारायण बरुमल अग्रवाल (वय-६२) हे तब्बल २६ बोगस कंपन्या तयार करण्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. या कंपन्यांनी  ५६ कोटी ३४ लाखांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घेतले आहे आणि ५४ कोटी ६४ लाखांचे बनावट कर क्रेडिट वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता पास करुन वस्तू आणि सेवाकर विभागाची फसवणूक केली.            

या प्रकरणात बनावट करदात्यांकडून खरेदी इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला गेला आणि महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर कायदा २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे वस्तू आणि सेवाकर विभागाने १६ नोव्हेंबर २०२२ रोजी रामनारायण बरुमल अग्रवाल यांना अटक केली आहे. या व्यक्तीला मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती, विभागाने दिली आहे.            

पुणे-2 क्षेत्राचे राज्यकर सहआयुक्त दीपक भंडारे यांच्या नेतृत्वाखाली ही अटकेची कारवाई करण्यात आली. राज्यकर उपायुक्त सुधीर चेके यांच्या देखरेखीखाली आणि सहायक राज्यकर आयुक्त श्रीकांत खाडे, रुषिकेश अहिवळे, प्रदीप कुलकर्णी यांच्यासह राज्यकर निरीक्षकांनी ही कारवाई पूर्ण केली. पुणे विभागाचे अप्पर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अटकेची संपूर्ण कारवाई करण्यात आली असल्याची माहिती, राज्यकर सहआयुक्तांनी दिली.


Tags: Fake BillsFake InvoiceGSTmaharashtra GSTpuneवस्तू व सेवाकर विभाग
Previous Post

भारतातील १३% ड्रग्स व्यसनी २० वर्षांखालील कोवळे तरुण! UNचा धक्कादायक अहवाल!!

Next Post

खासगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत ६० हजार कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मंजूर – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Next Post
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मंत्रालयात पत्रकार परिषद 1

खासगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत ६० हजार कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मंजूर - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!