मुक्तपीठ टीम
सलग सात वर्षे मंगळाला प्रदक्षिणा घालत असलेला मार्स ऑर्बिटर जबरदस्त कामगिरी बजावत आहे. मंगळ ऑर्बिटर मिशन हा अंतराळातील भारतीय पराक्रमाचा नवा पुरावा ठरला आहे. ५ नोव्हेंबर २०१३ रोजी इस्रोने मंगळ ऑर्बिटर प्रक्षेपित केल्यानंतर २४ सप्टेंबर २०१४ पासून मंगळाला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी ४५० कोटी रुपयांचे हे मिशन सहा महिने काम करेल, अशी अपेक्षा होती. परंतु हा अंदाज सकारात्मकरीत्या चुकीचा ठरला आहे. सहा महिने चालेल अशी अपेक्षा असणाऱ्या या मिशनने आता सात वर्षे पूर्ण केली आहेत.
मिशन मंगळ ऑर्बिटर
- मंगळ ऑर्बिटर मोहिमेने पृथ्वीवरील सात वर्षे पूर्ण केली असली तरी मंगळाची तीनच वर्षे पूर्ण केली आहेत.
- कारण, मंगळाचे एक वर्ष हे आपल्या दोन वर्षां एवढे आहे.
- मंगळ ऑर्बिटरच्या प्रक्षेपणाच्यावेळी इस्रोचे अध्यक्ष के.राधाकृष्णन यांनी याचे संतोषजनक कामगिरी असे वर्णन केले.
- भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेने सर्व उद्दिष्टे पूर्ण केली आणि भारतीय तांत्रिक पराक्रमाचे प्रदर्शन केले.
- याद्वारे, इस्रोने अंतराळ मोहिमांची रचना, यंत्रणा आणि उपप्रणालींचा वापर, आंतरग्रहांचे प्रक्षेपण, दुसऱ्या ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करणे, मंगळाभोवती अवकाशयान आणि वैज्ञानिक उपकरणांचा वापर शिकला.
- यामुळे भारताने अवकाशातील एक प्रमुख स्थान मिळवले आहे.
मिशनविषयी इतर माहिती आणि त्याची सध्याची स्थिती काय आहे?
- ७ वर्षे काम करूनही या ऑर्बिटची स्थिती चांगली आहे. असे एमओएमचे कार्यक्रम संचालक एम. अण्णादुराई म्हणाले.
- त्यातील काही भागात समस्या होत्या. त्यामुळे अशी काही कामे थांबवण्यात आली आहेत, जी आता वापरात नव्हती.
- अण्णादुराईंचा दावा आहे की, आताही हे मिशन आणखी एक वर्ष काम करू शकते.
- एमओएमद्वारे सात वर्षे काम करण्यात आले. म्हणजेच नियोजनापेक्षा १४ पट जास्त काम करण्याचे कारण म्हणजे चांद्रयान-१ मोहिमेद्वारे मिळालेल्या अनुभवांवर आधारित सुधारणा आहेत.
- एमओएममध्ये जास्तीत जास्त इंधन वापराची काळजी घेण्यात आली आहे.
- अंतराळयान अधिक चांगल्या कॉन्फिगरेशनसह तयार केले गेले.
पाहा व्हिडीओ:
https://youtu.be/6eV6QmZ8HNE