Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एक व्यक्ती, एक पद नियमाप्रमाणे काँग्रेसच्या ५१ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे!

June 3, 2022
in घडलं-बिघडलं
0
51 Congress office bearers resign

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिर्डीत पार पडलेल्या दोन दिवसांची नवसंकल्प कार्यशाळेत राजकीय, सामाजिक मुद्द्यांसह विविध मुद्द्यांचा सखोल उहापोह करण्यात आला. या शिबिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली व त्यातून एक महत्वाचा दस्तावेज तयार झाला आहे. हा दस्तावेज जाहीरनाम्यासह विविध योजना राबवण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. काँग्रेस पक्ष लोकशाहीला माननारा पक्ष असल्याने या शिबिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी मोकळेपणाने व स्पष्टपणे मते मांडली व ती मते विचारात घेण्यात आली. अशा पद्धतीची लोकशाही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे का ? असा सवाल विचारत, ते फक्त आदेश देण्याचे काम करतात, असे प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेची सांगता शिर्डीतील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात झाली, यावेळी पाटील बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व राज्याचे सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

समारोपप्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, दोन दिवसाच्या या शिबिरात उदयपूर घोषणापत्राची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून ‘एक व्यक्ती, एक पद’ नियमानुसार या शिबिरात ५१ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून ही पक्रिया पुढेही चालूच राहणार आहे. सहा विभागांनी केलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्याचे कामही केले जाणार आहे. सरकार व पक्ष संघटना यांच्यात समन्वय साधणे, संघटन वाढवणे यावरही विस्तृत चर्चा झाली आहे. केंद्रातील भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून शेतकरी आंदोलनावेळी शेतकऱ्यांचा नक्षलवादी, दहशतवादी आंदोलनजीवी म्हणून अपमान केला त्याचा निषेधही या शिबिरात करण्यात आला. फडणवीस सरकारने शिवाजी महाराजांच्या नावाने फसवी शेतकरी कर्जमाफी योजना राबवली व शिवाजी महाराजांचाही अवमान केला. महाविकास आघाडी सरकारने मात्र सत्ता येताच दिलेले आश्वासन पूर्ण करत सरसकट कर्जमाफी दिली, जनतेला दिलेला शब्द पाळला. हे सरकार शेतकरी, कामगार, दलित, वंचित समाजाच्या हिताचे रक्षण करणारे सरकार आहे.

यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, शिर्डी कार्यशाळेतील दोन दिवसाच्या मंथनातून जे सार निघाले आहे त्याचे एक दिशादर्शक पुस्तक बनू शकते. आता याची अंमलबजाणी करायची आहे. १०० दिवसांचा कार्यक्रम बनवावा लागणार आहे. त्यानंतर त्याचा उपयोग आगमी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाला निश्चितच होईल. महाराष्ट्र राज्य स्वतंत्र होण्याअगोदर शिर्डीत यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक अधिवेशन पार पडले होते या अधिवेशनात त्यावेळचे मातब्बर नेते सहभागी झाले होते हे अधिवेशन काँग्रेससाठी लाभदायी ठरले तसेच हे अधिवेशनही काँग्रेस पक्षाला फलदायी ठरेल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त करून ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.


Tags: CongressCongress Offic BearersMaharashtrashirdiकाँग्रेसनवसंकल्प कार्यशाळाॉमहाराष्ट्रशिर्डी
Previous Post

राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत १२४ नवीन सेवा दवाखान्यांचे उद्दिष्ट

Next Post

चिपळूणमधील मृत कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आर्थिक मदत

Next Post
Uddhav Thackeray

चिपळूणमधील मृत कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आर्थिक मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!