कोल्हापूर/ उदयराज वडामकर
सीमा प्रश्नाची तातडीने प्रश्न सोडवणे यासाठी ५००० सीमा वासी याचा आज कोल्हापूर मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्ना तातडीने सोडवावा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमेवासियांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
सीमा वादाचे कोल्हापुरात होणाऱ्या आंदोलनासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय सहभागी झाले होते. आंदोलनासाठी सीमावासीय रॅलीने कोगनोळी नाक्यावरून थेट महाराष्ट्र येण्याआधी त्यांचे स्वागत करण्यात आले. सीमा प्रश्नाचा प्रदिघॅ लढा सुरू आहे .
सीमा भागात मराठी बांधवांवर सातत्याने अन्याय केले जात आहेत. कर्नाटकच्या हुकूमशाही विरोधात सतत सीमावासीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. कर्नाटक सरकारकडून मराठी बांधवावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात तसेच सीमा प्रश्न सोडवणूक व्हावे यासाठी सीमा वासियाकडून कोल्हापूरमध्ये धरणे आंदोलन करण्याची हाक दिली आहे.
रॅली कोगनोळी नाक्यावरून बिंदू चौक, शिवाजी चौक, दसरा चौक या ठिकाणी प्रत्येक महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत रॅली दसरा चौकातून जिल्हाधिकार्यालयावर आंदोलन स्थळी पोहोचली पंतप्रधानांच्या नावे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
युवक विविध पक्ष संस्था संघटना कार्यकर्ते पदाधिकारी आदींचा या रॅलीमध्ये सहभाग होता या रॅलीमध्ये सीमा भागातून येणारे आंदोलन मोटरसायकल फोर व्हीलर अशा वाहनाच्या ताफ्यातून कोल्हापूर मध्ये दाखल झाले.