मुक्तपीठ टीम
अत्याधुनिक कार्बन न्यूट्रल इलेक्ट्रिक बस आणि वजनाने हलक्या व्यावसायिक वाहनांची कंपनी स्विच मोबिलिटी लिमिटेड (‘स्विच’) आणि भारतातील आघाडीची वाहतूक तंत्रज्ञान कंपनी चलो यांनी भारतभरात ५,००० अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस तैनात करण्यासाठी धोरणात्मक सहयोग करत असल्याचे आज जाहीर केले. तीन वर्षांच्या सुरुवातीच्या कालावधीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. बसेस मेट्रो आणि इतर शहरांमध्ये तैनात केल्या जातील, ज्यामध्येसुरुवातीला स्विच EiV १२ प्रकारच्या गाड्या समाविष्ट आहेत.
स्विच मोबिलिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्विच मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य कामकाज अधिकारी महेश बाबू म्हणाले, “भारतातील बदलत्या दळणवळण रचनांमुळे लोकांच्या शहरांमध्ये प्रवास करण्याच्या पद्धतीत लक्षणीय बदल होत आहेत. स्वच्छ, शाश्वत इलेक्ट्रिक वाहतूक उपायांचा अवलंब करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाला चालना देताना या क्षेत्रात अशा प्रकारची पहिली भागीदारी चलो सोबत करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत इलेक्ट्रिक वाहन उत्पादनांसह चलोच्या मजबूत ग्राहक संपर्क आणि ऑपरेशनल कौशल्याचा फायदा घेऊन देशातील शहरी गतिशीलता बदलण्याचे आमचे ध्येय आहे. ५००० इलेक्ट्रिक बसेसची ही महत्त्वपूर्ण भागीदारी ग्राहकांचा एकूण अनुभव उंचावताना नक्कीच परवडणाऱ्या, आरामदायी, त्रासमुक्त आणि पर्यावरणास अनुकूल वाहतूक उपायांसाठी निश्चित प्रवेश खुला करेल.”
चलोचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित दुबे म्हणाले, “भारताच्या दैनंदिन प्रवासात बसेसचा ४८% वाटा आहे आणि तरीही आपल्याकडे १०,००० लोकांसाठी फक्त ३ बस आहेत. बसचा ताफा वाढवणे आणि उच्च दर्जाच्या बसेस उपलब्ध करून देणे हे प्रत्येकासाठी प्रवास अधिक चांगला करण्याचा चलोचा उद्देश साध्य करण्यासाठीची महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. गेल्या वर्षी आम्ही आमच्या तीन शहरांमध्ये १,००० नवीन बसची भर घालण्याचा प्रकल्प अंतिम केला. आज ५ पट मोठ्या प्रमाणावर स्विचसह भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. या बसमधील प्रवासाचा अनुभव हाँगकाँग आणि सिंगापूर सारख्या जागतिक शहरांमधील प्रवासाच्या तोडीचा असेल. आम्हाला विश्वास आहे की हा सहयोग शाश्वत शहरे निर्माण करण्याच्या दिशेने आमचा एकत्रित प्रवास पुढे सुरू ठेवेल.”
या भागीदारीअंतर्गत स्विच आणि चलो सध्या चलो कार्यरत असलेल्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेस तैनात करण्यासाठी संयुक्तपणे गुंतवणूक करतील. चलो लाइव्ह बस ट्रॅकिंग, डिजिटल तिकिटे आणि प्रवास योजना यांसारख्या सुविधा देणारे चलो अॅप आणि चलो कार्ड सारख्या ग्राहक तंत्रज्ञान उपायांचा वापर करेल; आणि मार्ग, वारंवारता, वेळापत्रक आणि भाडे देखील निर्धारित करेल. स्विचच्या जबाबदाऱ्यांमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा आणि देखभाल यांचा समावेश आहे.
स्विच मोबिलिटी बद्दल
स्विच मोबिलिटी ही हरित दळणवळणाद्वारे जीवन समृद्ध करण्याचे ध्येय असलेली अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस आणि वजनाने हलक्या व्यावसायिक वाहनांची कंपनी आहे. एक परिपक्व स्टार्ट अप असलेल्या स्विच मध्ये जगातील चौथ्या क्रमांकाची बस OEM अशोक लेलँड आणि बस डिझाइनमध्ये नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात शतकाहून अधिक अनुभव असलेल्या UK बस उत्पादक, Optare यांच्या नाविन्यपूर्ण EV घटकांमधून परिश्रमपूर्वक उत्पादन करण्यात आले. २०१४ मध्ये, स्विच (त्यावेळचे Optare) ने लंडनच्या रस्त्यांवर प्रथम ब्रिटीश निर्मित, शुद्ध इलेक्ट्रिक बसेस सादर केल्या आणि तेव्हापासून विकसित आणि विकसनशील बाजारपेठांमध्ये ३० दशलक्ष इलेक्ट्रिक मैल चालवून ३०० ईव्हीज मार्गांवर आणल्या आहेत.
यूके तील लीड्स आणि भारतातील चेन्नई येथे आमच्या साइट्सवर समर्पित टीम्ससह एक समूह म्हणून काम करताना आमची बाजारपेठेतील आघाडीची वाहने जगभरातील ४६ पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जातात आणि अद्वितीय उत्पादने तयार करण्यासाठी ब्रिटिश आणि भारतीय डिझाइन, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी यांचा उत्तम मेळ घालतात. हलक्या वजनाच्या वाहन रचने मधील अनुभव, निव्वळ शून्य कार्बन तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, सॉफ्टवेअर आणि ग्राहक सेवा यामधील आमच्या प्रात्यक्षिक अनुभवाचा.