मुक्तपीठ टीम
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून मुकुंद भवन ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) सहायता (कोविड १९) करिता ५० लाख निधीचा धनादेश डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते संतोष देशमुख (उपविभागीय अधिकारी, पुणे) यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. आज बुधवार, ३१ मार्च २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती(तिथीनुसार) निमित्त ही आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून जनतेसाठी देण्यात आली. या वेळी पुरुषोत्तम लोहिया (विश्वस्त, मुकुंद भवन ट्रस्ट), आदित्य लोहिया (मुकुंद भवन ट्रस्ट), डॉ. शैलेश गुजर( अध्यक्ष, परिवर्तन), डॉ. प्रितम शाह(सचिव, परिवर्तन) उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, कोरोनाचा संसर्ग वाढत असताना या प्रकारची मदत गावागावात पोहचत आहे. एकार्थाने मोठ कर्तव्य ‘मुकुंद भवन ट्रस्ट’ जपत आहे त्यामुळे पुरुषोत्तम लोहिया व त्यांच्या सर्व ट्रस्टींचे त्यांनी आभार मानले.