मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ही लाट किती हानीकारक असेल? कोणत्या वयोगटाला या लाटेचा सर्वाधिक धोका असेल? लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोनाची लागण होणार का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या लाटेबाबत अनेक अंदाज लावले जात आहे. विशेषत: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर कसा आणि किती परिणाम होणार, हा एक चिंतेचा विषय आहे. आयसीएमआर तज्ज्ञांच्या मते देशातील ५० टक्के मुलांना याआधीच कोरोनाची लागण होऊन गेल्याची शक्यता आहे.
देशातील निम्म्या मुलांना आधीच कोरोना लागण
- आयसीएमआरच्या एपिडेमियोलॉजी आणि संसर्गजन्य रोगांचे प्रमुख डॉ समीरन पांडा यांनी दिलासादायक वक्तव्य केले आहे.
- देशात झालेल्या चौथ्या सेरो सर्वेक्षणानुसार, देशातील ५० टक्क्यांहून अधिक मुलांना आधीच कोरोनाची लागण होऊन गेली आहे.
- मुलांमध्ये संसर्गाची पातळी प्रौढांपेक्षा किंचित कमी आहे.
- आपल्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल अतिकाळजी करण्याची गरज नाही.
- ज्या राज्यांमध्ये लसीकरण सर्वाधिक झाले आहे तिथे शाळा हळूहळू उघडू शकतात.
काही राज्यांनी आधीच निर्बंध लादले
- डॉ. सीमरन पांडा यांनी सांगितले की, ज्या राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सौम्य होती तिथे तिसरी लाटही तीव्र नसणार आहे.
- काही राज्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्राचे अनुकरण करत आधीच निर्बंध लागू केले आहेत.
शाळा उघडण्याबाबत आयसीएमआरचा होकार
- आयसीएमआरने म्हटले होते की कोरोनाची दुसरी लाट सौम्य होताच शाळा उघडल्या जाऊ शकतात.
- त्यांचा युक्तिवाद असा होता की, प्राथमिक शाळा मोठ्या वर्गाऐवजी आधी उघडली जावी, कारण त्या मुलांवर प्रभाव फारसा दिसत नाही.
शाळा उघण्याचा निर्णय घाईत घेऊन नये, इतर डॉक्टरांचा इशारा
- दुसरीकडे, काही डॉक्टरांनी शाळा उघडण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
- आपल्या देशात लोकसंख्या जास्त आहे, अशा परिस्थितीत जर लहान मुलं मोठ्या संख्येने आजारी पडलीत तर त्यांच्यावर उपचार घेणं कठीण होईल. म्हणून शाळा उघण्याचा निर्णय घाईत घेऊन नये, असं मत काही डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.
- त्यासाठी अमेरिकेचा दाखला दिला जातो. तेथील अनुभव वाईट आहेत. तेथे शाळा उघडताच कोरोना संसर्ग वाढला.