अॅड. असीम सरोदें
“मराठा आरक्षणाच्या सुनावणीबद्दल कायद्याची प्रक्रिया योग्य व नीट समजावून सांगणे आवश्यक आहे, तसे न करता काही लोकांची दिशाभूल करत आहेत. तसे करू नये. प्रत्येकाने राजकारण करायचे थांबवावे,” असे आवाहन अॅड. असीम सरोदे यांनी केले आहे.
काय म्हटले आहे अॅड. असीम सरोदे यांनी:
१- सर्वोच्च न्यायालयाच्या ९ न्यायाधीशांच्या न्यायपीठाने दिलेला निर्णय बदलायचा असेल म्हणजे रिव्हर्ट करायचा असेल तर अर्थात ११ न्यायाधीशांच्या न्यायपीठानेच तसे करावे लागेल.
२- हे प्रकरण ११ न्यायाधीशांनी विचारात घ्यावे की नाही याचा विचार ५ न्यायाधीशांच्या न्यायपीठाला घ्यावा लागेल.
३- राज्य सरकारने याबाबत केलेला अर्ज अगदी बरोबर आहे. यात काहीही वेळ वाया घालविण्याचा मुद्दा नाही.
४- मराठा आरक्षणाबाबत बोलतांना संबंधितांनी कायदेविषयक दिशाभूल करणे, टीव्ही चॅनेल ॉवर काहीही बोलणे थांबवावे. सर्वोच्च न्यायालयाचे ११ न्यायाधीशांचे न्यायपीठच पूर्ण निर्णय घेऊ शकते हे लक्षात घ्यावे.
५- कायद्याची प्रक्रिया योग्य व नीट समजावून सांगायची की लोकांची दिशाभूल करायची ? प्रत्येकाने राजकारण करायचे हे थांबवावे.