Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“उरुळी कांचन येथे मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन”: एस.एम.देशमुख

September 22, 2021
in घडलं-बिघडलं
0
Marathi Press Council

मुक्तपीठ टीम

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे अधिवेशन १८ आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी पुणे जिल्हयातील उरुळी कांचन येथे होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी काल उरुळी कांचन येथे झालेल्या एका बैठकीत केली. दर दोन वर्षांनी होणारे पत्रकारांचे हे अधिवेशन ऑगस्टमध्येच होणं अपेक्षित होतं मात्र कोरोनामुळं अधिवेशन लांबणीवर टाकावे लागले होते..देशभरातुन दोन हजार प्रतिनिधी अधिवेशनास उपस्थित राहतील असा अंदाज देशमुख यांनी व्यक्त केला त्यादृष्टीने तयारी केली जात आहे.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही देशातील मराठी पत्रकारांची सर्वात जुनी आणि एकमेव संघटना आहे.. दिल्ली, गोवा, बेळगाव सह राज्यातील ३६ जिल्हे आणि ३५४ तालुक्यात मराठी पत्रकार परिषदेचा शाखा विस्तार झालेला असून जवळपास नऊ हजार पत्रकार परिषदेशी जोडलेले आहेत. दर दोन वर्षांनी होणारे हे अधिवेशन यापुर्वी रोहा, औरंगाबाद, शेगाव, पिंपरी-चिंचवड, नांदेड आदि ठिकाणी संपन्न झाले होते. उरुळी कांचन सारख्या ग्रामपंचायत क्षेत्रात प्रथमच हे अधिवेशन होत आहे. काल एस.एम.देशमुख, परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी नियोजित अधिवेशनाच्या जागेची पाहणी केली.

दोन वर्षांपुर्वी नांदेड येथे झालेल्या पत्रकारांच्या अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकाराच्या हस्तेच व्हावे अशी भूमिका परिषदेने घेतली.. त्यानुसार नांदेड अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावर्षी देखील एका ज्येष्ठ आणि मान्यवर पत्रकाराच्या हस्ते अधिवेशऩाचे उद्धघाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राज्यातील मान्यवर नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. अधिवेशनात दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. चर्चासत्र, परिसंवाद, आदि कार्यक्रमाबरोबरच आप की आदालत पध्दतीवर आधारित एका वरिष्ठ पत्रकाराच्या मुलाखतीचा कार्यक्रम देखील आयोजित केला जाणार आहे. डिजिटल माध्यमांचा प्रभाव बघता प्रिन्ट मीडियाला काही भवितव्य उरले आहे काय? या महत्वाच्या सर्व पत्रकारांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर देखील अधिवेशनात विचारमंथन होईल. पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि हवेली तालुका मराठी पत्रकार संघ हे या अधिवेशनाचे आयोजक आहेत. अधिवेशनास येणाऱ्या पत्रकारांची संख्या लक्षात घेऊन आरोग्य विषयक सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. दोन कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेतलेल्या पत्रकारांनाच अधिवेशनात प्रवेश दिला जाईल, तसेच अधिवेशनात सोशल डिस्टंन्सिन, सॅनिटाईझर वापर, शारीरिक तापमान तपासणी बरोबरच आरोग्य पथक देखील तैनात करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

 

बैठकीस स्थानिक संयोजन समितीचे पदाधिकारी सुनील जगताप, जनार्दन दांडगे, एम.जी.शेलार. बापुसाहेब काळभोर, गणेश सातव, तुळशीराम घुसाळकर, शहाजी नगरे, जयदिप जाधव, सुखदेव भोरडे, जितेंद्र आव्हाळे, विजय काळभोर, अमोल भोसले, सचिन माथेफोड, प्राचार्य बी.के. दिवेकर, उपप्रमुख बी.आर. भोसले आदि उपस्थित होते.

 

राज्यातील पत्रकारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या अधिवेशनास पत्रकारांनी सर्व नियमांचे पालन करित मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, राज्य प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन, महिला संघटक जान्हवी पाटील, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, संयोजन समितीचे सुनील जगताप, जनार्दन दांडगे, बापुसाहेब काळभोर, गणेश सातव, तुळशिराम घुसाळकर, शहाजी नगरे, जयदिप जाधव, सुखदेव भोरडे, जितेंद्र आव्हाळे, अमोल भोसले, विजय काळभोर, आदिंनी केले आहे.

 


Tags: उरुळी कांचनएस.एम.देशमुखनांदेडमराठी पत्रकार परिषद
Previous Post

कर्मवीर भाऊराव पाटील: बहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष!

Next Post

राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रजनीताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Next Post
congress

राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रजनीताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!