मुक्तपीठ टीम
गुजरातमध्ये सध्या संकटांचा महापूरच आला आहे. एका मागे एक संकट येत आहे. आधी पूरच्या पाण्याने लोकांना नकोसे झाले आता ही नवीन घटना समोर आली आहे. बनावट विषारी दारू प्यायल्याने मृतांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. गुजरात पोलिसांच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे की, दारूऐवजी सर्व लोकांना बाटलीत केमिकल देण्यात आले होते. हे रसायन प्यायल्यानंतर ते सर्वांच्याच जीवावर बेतलं आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने संशयितांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यानुसार इमॉस नावाच्या कंपनीने मिथाइलचा पुरवठा केला होता. असे कळले. या लोकांनी दारू प्यायलेल्या बाटलीत हे मिथाइल होते.
याबाबत पोलिसांनी आता फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालाच्या आधारे एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे बोलले जात आहे. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
विषारी दारूत मिथाईलचा समावेश करून विक्री
- इमॉस नावाच्या कंपनीने मिथाइलचा पुरवठा केला होता. दारूमध्येही मिथाइलचा समावेश होता.
- गोदामाचा व्यवस्थापक जयेश उर्फ राजू याने २०० लिटर मिथाईल नातेवाईक संजय याला ६० हजार रुपयांना दिले होते.
- यानंतर संजय आणि त्याचा साथीदार पिंटू यांनी मिथाईलने भरलेले पाऊच विकल्याचे सांगण्यात येत आहे.
- देसी अल्कोहोल या नावाने हे सॅचेस लोकांना विकले जात होते. ते पिऊन लोकांचा मृत्यू झाला.
- इमॉस कंपनीने एकूण ६०० लिटर मिथाईलचा पुरवठा केला होता. यातून सुमारे ४५० लिटर मिथाईल पोलिसांनी जप्त केले आहे.