कोल्हापूर / उदयराज वडामकर
अदानी इलेक्ट्रिकल कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियमावर नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवानेच्या विरोधात राज्यातील वीज कामगार संघटना आज ७२ तासाच्या संपावर जात आहे. हा संप भांडवलदारांच्या विरोधात असल्याचा दावा वीज आंदोलकांनी केला आहे. दरम्यान या संप काळात ग्राहकांना अखंड पुरवठा मिळावा यासाठी महावितरण ने तयारीही केली आहे या काळात वीज पूर्ण बंद राहणार नाही .
सोशल मीडियावरील जसे मेसेज पाहून लोकांना काळजी वाटत आहे वीस अचानक गेल्यास त्यामध्ये काही बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी अडचणी येऊ शकतात संपात राज्यभरातील ३० संघटना सहभागी झाले आहेत .
कोल्हापूर जिल्ह्यातील ४००० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. विद्युत ग्राहक आणि त्यांचे मोबाईल चार्ज करून ठेवावेत, पाण्याच्या टाक्या भरून द्याव्यात, दळण दळून घ्यावे असे आव्हाने महाराष्ट्र राज्य कर्मचारी अधिकारी संघर्ष समिती मार्फत करण्यात आले होते. भांडवलदारांच्या हातात ही कंपनी गेल्यास भविष्यातील दरवाढ ग्राहकांना परवडणारी नाही असे आव्हान संघटनांनी केले आहे या गोष्टीला विरोध म्हणून आंदोलक संघटनाने प्रशासनाला दीड महिन्यापूर्वी संपाची नोटीस दिली होती.