मुक्तपीठ टीम
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ‘माही’ हा स्वत: एक ब्रँड आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याचे उत्पन्न वाढत आहे. चालू आर्थिक वर्षात २०२२-२३ मध्ये धोनीने जमा केलेल्या आगाऊ करातून याची पुष्टी झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात धोनीने १३ कोटी रुपयांचा आगाऊ कर जमा केला होता, तर चालू आर्थिक वर्षात ही रक्कम १७ कोटी रुपये आहे.
धोनीच्या उत्पन्नात ३० टक्क्यांनी वाढ
- धोनीच्या उत्पन्नात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- चालू आर्थिक वर्षात मागील वेळेपेक्षा ४ कोटी रुपयांचा आगाऊ कर जमा केल्यामुळे ३० टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.
- क्रिकेट विश्वात प्रवेश केल्यापासून धोनी हे राज्यातील सर्वात मोठे वैयक्तिक करदाता आहेत.
- सध्या तो फक्त आयपीएल खेळतो.
आर्थिक वर्ष २०२०-२१ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत एकूण ८५ कोटी आयकर भरला आहे…
- २०२०-२१ आर्थिक वर्ष ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत महेंद्रसिंग धोनीने एकूण ८५ कोटी रुपये आयकर भरला आहे.
- २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण ३० कोटी रुपये आयकर भरला आहे.
- २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३८ कोटी रुपये दिले.
- एप्रिल २०२१ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत एकूण १३ कोटी रुपये भरले होते.
- एप्रिल २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या चालू आर्थिक वर्षात त्यांनी १७ कोटी रुपये आयकर भरला आहे.
या कंपनीतही धोनींची गुंतवणूक
ड्रोणी, बाइक रेसिंग टीम, फुटबॉल फ्रँचायझी, अकाउंट-बुक मोबाइल अॅप आणि सॉफ्टवेअर, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, फूड अँड बेव्हरेज कंपनी, स्पोर्ट्स फिट, स्पोर्ट्स मार्केटिंग आणि मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या कंपनीत धोनींची गुंतवणूक आहे.