Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता राज्यातील मनपांमध्येही ई-वाहनांचा वापर, सांगलीत स्वच्छता निरीक्षकांसाठी २४ ई बाईक!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Sangli Municipal Corporation

रॉबिन डेव्हिडसन / सांगली

सध्या देशाप्रमाणेच आपल्या महाराष्ट्रातही पर्यावरण साक्षरत वाढत आहे. प्रदूषण वाढवणाऱ्या पारंपरिक इंधनावरील गाड्यांपेक्षा प्रदूषणमुक्त ई-वाहनांकडे सामान्यांचाही कल वाढतो आहे. सरकारी पातळीवर तर धोरण म्हणून ई-वाहनांवरच भर देण्यात येत आहे. आतापर्यंत मुंबई, पुणे, नागपूरसारख्या महानगरांपुरताच मर्यादित असणारा ई-वाहनांचा वापर आता छोट्या शहरांमधील मनपांकडूनही सुरु होत आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या ताफ्यात नुकत्याच २४ ई बाईक दाखल झाल्या आहेत. माझी वसुंधरा आणि रेस टू झिरो अंतर्गत घेण्यात आलेल्या ई बाईक स्वच्छता निरीक्षक वापरणार आहेत.

 

अशा प्रकारे ई बाईक वापरणारी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. या २४ ई बाईक खरेदी करून सांगली महापालिकेने प्रदूषण मुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. या ई बाईक महापौर दिग्विजय सुर्यवंशी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस , स्थायी सभापती निरंजन आवटी आणि विरोधी पक्षेनेते संजय मेंढे , उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत स्वच्छता निरीक्षकांना प्रदान करण्यात आल्या.

 

आपल्या दैनंदिन कामकाजासाठी स्वच्छता निरीक्षक यांना आपल्या प्रभागात फिरतीसाठी आणि अन्य कार्यालयीन कामकाजासाठी वापरता येणार आहेत. या ई बाईकमुळे सांगली महापालिकेने यापूर्वीच प्रदूषणमुक्तीसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्यात या ई बाईकमुळे प्रदूषणमुक्त सांगली करण्यासाठी आणखी ऊर्जा मिळणार आहे. अशा प्रकारे स्वच्छता निरीक्षकांना ई बाईक देणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका आहे. ई बाईक प्रदान केल्यानंतर सर्व स्वच्छता निरीक्षकानी या ई बाईकवरून शहरात फेरी काढत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, पर्यावरणाचे रक्षण करा असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे. वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर आणि अनिल पाटील, याकूब मद्रासी, ए वाय बारगिर यांनी या फेरीचे आयोजन केले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: e-bikeE-vehiclegood newsmuktpeethPollution free e-vehiclesSangli Miraj and Kupwad Municipal CorporationSangli Municipal CorporationSanitation Inspectorई-बाईकई-वाहनचांगली बातमीप्रदूषणमुक्त ई-वाहनमुक्तपीठसांगली मनपासांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकास्वच्छता निरीक्षक
Previous Post

राज्यात १५७ नवे रुग्ण, २९८ रुग्ण बरे! मुंबई २७, नाशिक १, नागपूर २ नवे रुग्ण !!

Next Post

लवकरच देशात बारा वर्षांवरील मुलांचं लसीकरण आणि सर्वच ज्येष्ठांना बुस्टर डोस!

Next Post
vaccine

लवकरच देशात बारा वर्षांवरील मुलांचं लसीकरण आणि सर्वच ज्येष्ठांना बुस्टर डोस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!