Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बाविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन २७ ऑक्टोबर रोजी भोसरीत होणार

प्रा. लक्ष्मणराव ढोबळे आणि वंचित विकास संस्थेला राष्ट्रीय बंधुता पुरस्कार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bandhuta

मुक्तपाठ टीम 

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक या संस्थाच्या वतीने इंद्रायणीनगर, भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयामध्ये २७ ऑक्टोबर २०२१ रोजी बाविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे आणि स्वागताध्यक्ष प्रा. डॉ अशोककुमार पगारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी कवयित्री संगीता झिंजुर्के, प्रकाश जवळकर, प्राचार्य सदाशिव कांबळे आदी उपस्थित होते.
Sammelan Patrika
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी दहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होईल. डॉ. विजय ताम्हाणे अणि डॉ. अरुण आंधळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी बनसोडे यांच्या ‘बंधुतेची भाषा’ या पुस्तकाचे प्रकाशन होईल. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कारांचे वितरण होईल.
दुपारच्या सत्रात राष्ट्रकवी विलास ठोसर (अकोट) यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे ‘काव्य पंढरी’ कविसंमेलन होईल. ज्येष्ठ कवयित्री मधुश्री ओव्हाळ या या स्वागत प्रमुख असतील. संगिता झिंजुरके सूत्रसंचालन करतील. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवीचा सहभाग राहील. यावेळी डॉ. नयनचंद्र सरस्वते ‘बयो कविते…’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल. याप्रसंगी बबन धूमाळ यांना लोककवी वामनदादा कर्डक, पितांबर लोहार यांना लोकगायक प्रल्हाद शिंदे आणि दिनेश भोसले यांना पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

सायंकाळी राष्ट्रीय बंधुता पुरस्कार वितरणाने संमेलनाचा समारोप होईल. माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे आणि वंचित विकास संस्था पुणे यांना यावर्षीचा राष्ट्रीय बधुता पुरस्कार प्रदान केला जाईल. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी काही गुरुजनांना साने गुरुजी मूल्यजागर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. याप्रसंगी रोटरी क्लबचे प्रांतपाल पंकज शहा, प्रकाश जवळकर आणि वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांची प्रमुख उपस्थिती राहील. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी रामदास जैद आणि प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.


Tags: Chandrakant WankhedeNational Fraternity Literary CouncilPrakash RokdeRotary Club of Dynamicबंधुताचार्य प्रकाश रोकडेराष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदरोटरी क्लब ऑफ डायनॅमिकसाहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे
Previous Post

आघाडी सरकारविरोधात ‘रिपाइं’ची तीव्र निदर्शने

Next Post

महाराष्ट्राच्या विविध भागातील लोककलेचा एकत्रित आराखडा तयार करावा – उदय सामंत

Next Post
uday samant on mumbai university

महाराष्ट्राच्या विविध भागातील लोककलेचा एकत्रित आराखडा तयार करावा - उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!