मुक्तपीठ टीम
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात ३४.३५ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना १०४.६० (१०५.२५), धोम १३.५० (१३.५०), कन्हेर १०.१० (१०.१०), वारणा ३४.३५ (३४.४०), दूधगंगा २१.९७ (२५.४०), राधानगरी ८.२२ (८.३६), तुळशी ३.४७ (३.४७), कासारी २.७० (२.७७), पाटगांव ३.७० (३.७२), धोम बलकवडी ४.०८ (४.०८), उरमोडी ९.९५ (९.९७), तारळी ५.७७ (५.८५), अलमट्टी १२१.०९ (१२३). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना – २१००, धोम – १३१८, कण्हेर – ५७४, वारणा – ५९१, दुधगंगा – २९०५, राधानगरी- निरंक, तुळशी – निरंक, कासारी – निरंक, पाटगांव – २५०, धोम बलकवडी – ३३०, उरमोडी – ३५०, तारळी – ३५० व अलमट्टी धरणातून ७४ हजार ९५१ क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड ८.७ (४५), आयर्विन पूल सांगली ११.६ (४०) व अंकली पूल हरिपूर १५.४ (४५.११).