मुक्तपीठ टीम
कावासाकीची निंजा बाइक्स सर्वोत्तम पॉवर आउटपुट देतात. कावासाकीने निंजा ६५०सीसी भारतात लाँच केली आहे. ही बाईक त्याच्या सेगमेंटमध्ये खूप पॉवरफुल आहे आणि खूप स्टायलिश देखील आहे. ही बाईक लाइम ग्रीन कलरमध्ये सादर करण्यात आली आहे या बाईकमध्ये कावासाकी ट्रॅक्शन कंट्रोल (KTRC) फीचर देखील देण्यात आला आहे.
कावासाकीने निंजा ६५० २०२३ डिझाइन आणि फिचर्स…
- या बाईकमध्ये निंजाचे सिग्नेचर डिझाईन अजूनही पाहायला मिळेल.
- यात एलईडी हेडलाइट, एलईडी टेललाइट्स, कलर टीएफटी डिस्प्ले, कावासाकी ट्रॅक्शन कंट्रोल (KTRC), पहल आणि डनलॉप स्पोर्ट्समॅक्स रोडस्पोर्ट २ टायर्स यांसारखी फिचर्स मिळतील.
- कंपनीने या बाईकसोबत स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी फीचर देखील दिले आहे.
- याची किंमत ७.१२ लाख रुपये आहे.
- या बाईकमध्ये ६४९ सीसी पॅरलल ट्विन इंजिन वापरले आहे.
- हे एक अतिशय शक्तिशाली इंजिन आहे.
- हे इंजिन ८,००० आरपीएम वर ६७ बीएचपी पॉवर आणि ६,७०० आरपीएम वर ६४ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
- कंपनीने हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत पेअर केले आहे.