मुक्तपीठ टीम
भारतातीयांना २०२२ मध्ये प्रदूषणाचा अत्यंत बिकट सामना करावा लागत आहे. या प्रदूषणात कार्बन डाय ऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड यांसारखे विषारी वायू असतात. २०२२ हे वर्ष संपत आले आहे, पण तरीही जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जन विक्रमी पातळीवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२२मध्ये जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जन विक्रमी पातळीवर राहिले. यामध्ये घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत, तर जागतिक तापमानातील वाढ १.५ अंश सेल्सिअसच्या खाली ठेवण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणे आवश्यक आहे.
जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जन विक्रमी पातळीवर!
- उत्सर्जनाची सध्याची पातळी कायम राहिल्यास, पुढील नऊ वर्षांत ग्लोबल वार्मिंग १.५ अंश सेल्सिअसच्या मर्यादेपेक्षा जास्त होण्याची शक्यता ५०% पर्यंत वाढेल.
- २०२२मध्ये अंदाजे जागतिक स्तरावर एकूण ४०.६ अब्ज टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन होईल.
- हे जीवाश्म इंधनातून कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनामुळे होते, जे २०२२पर्यंत १% ने वाढून ३६.६ गिगा टनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
कोळसा आणि तेलाचे उत्सर्जन २०२१च्या पातळीपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. उत्सर्जनाच्या एकूण वाढीमध्ये तेलाचा सर्वात मोठा वाटा आहे. तेल उत्सर्जनात होणारी वाढ ही कोरोना साथीच्या आजारामुळे कारणीभूत आहे. कारण कोरोना निर्बंध लादल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पुन्हा सुरू झाली.