Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

आता दोन हजाराच्या नोटा चलनातून बाहेर जाणार?

March 16, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
2000 rupee

मुक्तपीठ टीम

देशात नोटाबंदीनंतर सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. यामुळे काळा पैसा आणि बनावट नोटांना आळा बसेल असे सांगण्यात आले होते. पण आता केंद्र सरकार २ हजारांच्या नोटा हद्दपार करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्याला कारणही तसंच आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षांपासून रिझर्व्ह बँकेने दोन हजाराच्या नोटा छापण्याचे आदेश दिलेले नाहीत. याचाच परिणाम म्हणून, देशभरात पसरलेल्या एकूण नोटांमधील दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या ३.२७ टक्क्यांवरून २.०१ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. येत्या काही दिवसांत त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. लेखी प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ३० मार्च २०१८ पर्यंत २००० रुपयांच्या ३३६.२ कोटी नोटा प्रचलित असून २६ फेब्रुवारी २०२१ रोजी तो २४९.९ कोटींवर आला आहे. किंमतीकडे पाहिलं तर मार्च २०१८ मध्ये एकूण सर्कुलेशनमध्ये ३७.३६ टक्के भाग हा २०००च्या नोटांचा होतो, त्यात आता १७.७८ टक्क्यांने घट झाली आहे. ठाकूर यांनी सांगितले की, कोणत्या मूल्याच्या किती नोटा छापल्या पाहिजेत, याचा निर्णय रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून घेण्यात येतो. तर आता दोन हजार रुपयांच्या नोटांनबद्दल बोलायचं झाल्यास २०१९-२० आणि २०२० ते २०२१ मध्ये नोटांची छपाईच करण्यात आलेली नाही

रिझर्व्ह बँकेकडून दोन हजाराच्या नोटा सर्कुलेशनमधून कमी करण्याचा प्रयत्न सतत सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

  • २०१६-१७ मध्ये २००० रुपयांच्या ३५४.३ कोटी नोटा छापल्या गेल्या.
  • २०१७-१८ मध्ये ११.५ कोटी नोटा छापल्या होत्या.
  • २०१८-१९ मध्ये ४.६७ कोटी नोटा छापल्या गेल्या.

सरकारने दोन हजारांच्या नोटा एक-दोन वर्षानंतर चलनातून काढून टाकण्याचे काम सुरू केल्याचे वरील आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याची चर्चा त्यामुळेच सुरु झाली आहे.

पहिल्या सत्ताकाळात ५००-१०००च्या नोटांवर बंदी, आता?
नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीच्या वेळी सरकारने देशात प्रचलित जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर करत ५००​आणि २००० रुपयांच्या नवीन नोटा आणल्या. काळ्या पैशाला आळा बसेल असे सांगत सरकारने २००० ची नोट चलनात आणली होती. या सरकारच्या निर्णयावर त्यावेळी विरोधी पक्षाने अनेक प्रश्न ही उपस्थित केले होते.


Tags: 2000 rupeesanurag thakurCentral Government Of Indiaअर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूरकेंद्र सरकारदोन हजारभारतीय रिझर्व्ह बँक
Previous Post

क्रीडा थोडक्यात: 1) भारत आणि इंग्लंड यांच्यामधील ट्वेन्टी-२० मालिका सुरु असताना आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ट्वेन्टी-२० मालिकातील पाचपैकी दोन सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडले आहेत. पहिल्या दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला होता. पण उर्वरीत तीन सामन्यांसाठी गुजरात क्रिकेट संघटनेने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. संघटनेच्या या निर्णयामुळे चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. 2) भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसाठी १६ मार्च ही तारीख खूप खास आहे. १२ मार्च २०११ रोजी विश्वकरंडक स्पर्धेत सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले ९९वे शतक केले होते. त्यानंतर अनेक सामने खेळल्यानंतरही सचिनला शतक करता आले नव्हते. शेवटी, बांगलादेशच्या मुशरफी मुर्तझाच्या चेंडूवर फटका खेळत सचिनची मोठ्या विक्रमाची प्रतीक्षा संपली. या सामन्यात सचिनने ११४ धावांची धमाकेदार खेळी केली होती. सचिनचा शतकांच्या शतकाचा विक्रम आजही अबाधित असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू म्हणून सचिनची ख्याती आहे. 3) रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या १५ वा सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका लीजण्डस संघाने बांगलादेश लीजण्डस संघावर १० गडी राखून मात मिळवली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या मालिकेच्या गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ पहिल्या स्थानावर असून इंडिया लीजण्डसचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशवरील विजयामुळे आफ्रिकेने तिसरे स्थान मिळवले आहे. तर, इंग्लंड आणि वेस्ट इंडिंज यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर चौथ्या स्थानी कोण येणार, हे स्पष्ट होईल. 4) फेडरेसन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अन्नू राणी हिने नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. राणीने ६३.२४ मीटर अशी कामगिरी करत स्वत:चाच ६२.४३ मीटरचा विक्रम मोडीत काढला. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष ६४ मीटर इतका आहे. त्यामुळे ऑलिम्पिकचा पात्रता निकष तिला पार करता आला नाही. 5) भारताच्या पहिल्यावहिल्या अल्टिमेट खो-खो लीगचा थरार अनुभवण्यासाठी चाहत्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. एप्रिल २०१९मध्ये या लीगची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. परंतु काही कारणांनी खो-खो लीग पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आता पुन्हा या स्पर्धेच्या आयोजनाकरिता महासंघाने पावले उचलली आहेत. देश-विदेशातील पुरुष खो-खोपटू आणि १८ वर्षांखालील मुलांच्या समावेशासह खेळवल्या जाणाऱ्या अल्टिमेट लीगच्या लढतींचे हिंदी, इंग्रजी भाषेतील समालोचनासह थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने खो-खो प्रेमींसाठी चांगली पर्वणी असणार आहे.

Next Post

सावधान! महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात!!

Next Post
corona 2nd wave

सावधान! महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!