Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चीनची नवी कपटी चाल! ब्रिटनमधील २०० शिक्षक हेरगिरीच्या जाळ्यात!!

ऑक्सफोर्ड विद्यापीठही वादाच्या भोवऱ्यात

February 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
view-University-of-Oxford-England-Oxfordshire

मुक्तपीठ टीम

चीनच्या कपटी चालीमुळे ब्रिटनमधील २०० शिक्षकांवर हेरगिरीचा आरोप झाला आहे. या शिक्षकांकडून माहिती घेत चीनने विध्वंसकारी शस्त्रे तयार करण्यासाठी त्यांचा गैरवापर केला. त्यामुळे चीनचा कावा यशस्वी झाला, पण शिक्षकांना शाळेऐवजी गजाआड जाण्याची पाळी आली आहे.

 चीनने कपटीपणे कसा साधला कावा?

  • ब्रिटनमधील शिक्षकांवर चीनसाठी ‘हेरगिरी’ करण्याचा मोठा आरोप झाला आहे.
  • ब्रिटनमधील २० विद्यापीठांमधील सुमारे २०० शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
  • या शिक्षकांनी फसवून मोठ्या प्रमाणावर विध्वंसकारी शस्त्रे तयार करण्यात चीनला मदत केली आहे का हे गुप्तचर अधिकारी तपासत आहेत.
  • ब्रिटिश अधिकारी शिक्षकांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांचे आणि मानवाधिकारांचे उल्लंघन केले आहे की नाही याची तपासणी करत आहेत.
  • त्यांच्यावर निर्यात नियंत्रण आदेश २००८ चे उल्लंघन केल्याचा संशय आहे.
  • दोषी आढळल्यास त्यांना १० वर्ष तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.

 

बंदी असतानाही चीनला संरक्षणविषयक मदत

सैन्य आणि सुरक्षा यांचा समावेश असलेल्या अत्यंत संवेदनशील भागात शत्रूच्या देशाला माहिती पाठविणे आणि बौद्धिक मालमत्तेच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी निर्यात नियंत्रण आदेश २००८मध्ये लागू करण्यात आला. ब्रिटिश विद्वानांनी विमान, क्षेपणास्त्र डिझाइन आणि सायबर शस्त्रे चीनकडे पाठविली आहेत. आता ब्रिटिश अधिकारी या २०० संशयीत लोकांना नोटीस पाठवण्याची तयारी करत आहेत.

 

ऑक्सफोर्ड विद्यापीठही वादाच्या भोवऱ्यात

वादग्रस्त चिनी कंपनीकडून देणगी मिळाल्याबद्दल ऑक्सफोर्ड विद्यापीठही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. चीनी सॉफ्टवेअर कंपनी टेंन्सेंट कडून ७ लाख पौंड देण्याच्या बदल्यात प्रतिष्ठित प्रोफेसरशिप ऑफ फिजिक्सचे नाव बदलण्याचे विद्यापीठाने ठरविले आहे. १९०० ते आत्तापर्यंत हे विद्यापीठात विकेहॅम चेयर ऑफ फिजिक्‍स म्हणून ओळखले जात असे आणि आता ती टेंन्सेन्ट-विकेहॅम चेयर म्हणून ओळखली जाईल. चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या इंटेलिजेंस शाखेशी टेंन्संटचे संबंध आहे.

 

ऑक्सफोर्ड विद्यापीठाकडे फेरविचाराची मागणी
ब्रिटनच्या दोन माजी कॅबिनेट मंत्र्यांनी ऑक्सफोर्डने आपल्या निर्णयावर फेरविचार करवा अशी मागणी केली आहे. त्याचवेळी ऑक्सफोर्डचे चान्सलर लॉर्ड पॅटेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंन्सेंटकडून मिळालेल्या पैशांवर ते भाष्य करणार नाही कारण त्याबद्दल त्यांना काही माहिती नाही. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या माहितीनुसार चीनच्या गुप्तचर खात्याशी टेंन्सेटचा घनिष्ठ संबंध आहे. टेंन्संट चिनी सुरक्षा एजन्सीसमवेत एआयवर काम करत आहे.


Tags: britain newschinaoxford universityऑक्सफोर्ड विद्यापीठब्रिटन शिक्षक
Previous Post

#सरळस्पष्ट गुलाम नबी आझादांचं #भारतीयत्व! कसं, कुणाला झेपणार?

Next Post

“खाद्य तेलात भेसळ करणाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द होणार!”

Next Post
yadravkar

"खाद्य तेलात भेसळ करणाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द होणार!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!