मुक्तपीठ टीम
चीनच्या कपटी चालीमुळे ब्रिटनमधील २०० शिक्षकांवर हेरगिरीचा आरोप झाला आहे. या शिक्षकांकडून माहिती घेत चीनने विध्वंसकारी शस्त्रे तयार करण्यासाठी त्यांचा गैरवापर केला. त्यामुळे चीनचा कावा यशस्वी झाला, पण शिक्षकांना शाळेऐवजी गजाआड जाण्याची पाळी आली आहे.
चीनने कपटीपणे कसा साधला कावा?
- ब्रिटनमधील शिक्षकांवर चीनसाठी ‘हेरगिरी’ करण्याचा मोठा आरोप झाला आहे.
- ब्रिटनमधील २० विद्यापीठांमधील सुमारे २०० शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
- या शिक्षकांनी फसवून मोठ्या प्रमाणावर विध्वंसकारी शस्त्रे तयार करण्यात चीनला मदत केली आहे का हे गुप्तचर अधिकारी तपासत आहेत.
- ब्रिटिश अधिकारी शिक्षकांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांचे आणि मानवाधिकारांचे उल्लंघन केले आहे की नाही याची तपासणी करत आहेत.
- त्यांच्यावर निर्यात नियंत्रण आदेश २००८ चे उल्लंघन केल्याचा संशय आहे.
- दोषी आढळल्यास त्यांना १० वर्ष तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.
बंदी असतानाही चीनला संरक्षणविषयक मदत
सैन्य आणि सुरक्षा यांचा समावेश असलेल्या अत्यंत संवेदनशील भागात शत्रूच्या देशाला माहिती पाठविणे आणि बौद्धिक मालमत्तेच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी निर्यात नियंत्रण आदेश २००८मध्ये लागू करण्यात आला. ब्रिटिश विद्वानांनी विमान, क्षेपणास्त्र डिझाइन आणि सायबर शस्त्रे चीनकडे पाठविली आहेत. आता ब्रिटिश अधिकारी या २०० संशयीत लोकांना नोटीस पाठवण्याची तयारी करत आहेत.
ऑक्सफोर्ड विद्यापीठही वादाच्या भोवऱ्यात
वादग्रस्त चिनी कंपनीकडून देणगी मिळाल्याबद्दल ऑक्सफोर्ड विद्यापीठही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. चीनी सॉफ्टवेअर कंपनी टेंन्सेंट कडून ७ लाख पौंड देण्याच्या बदल्यात प्रतिष्ठित प्रोफेसरशिप ऑफ फिजिक्सचे नाव बदलण्याचे विद्यापीठाने ठरविले आहे. १९०० ते आत्तापर्यंत हे विद्यापीठात विकेहॅम चेयर ऑफ फिजिक्स म्हणून ओळखले जात असे आणि आता ती टेंन्सेन्ट-विकेहॅम चेयर म्हणून ओळखली जाईल. चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या इंटेलिजेंस शाखेशी टेंन्संटचे संबंध आहे.
ऑक्सफोर्ड विद्यापीठाकडे फेरविचाराची मागणी
ब्रिटनच्या दोन माजी कॅबिनेट मंत्र्यांनी ऑक्सफोर्डने आपल्या निर्णयावर फेरविचार करवा अशी मागणी केली आहे. त्याचवेळी ऑक्सफोर्डचे चान्सलर लॉर्ड पॅटेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंन्सेंटकडून मिळालेल्या पैशांवर ते भाष्य करणार नाही कारण त्याबद्दल त्यांना काही माहिती नाही. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या माहितीनुसार चीनच्या गुप्तचर खात्याशी टेंन्सेटचा घनिष्ठ संबंध आहे. टेंन्संट चिनी सुरक्षा एजन्सीसमवेत एआयवर काम करत आहे.