मुक्तपीठ टीम
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगावजवळ अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महार्गावर भीषण अपघात घडला आहे. वेगाने जाणारा पपईचा ट्रक उलटून १५ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृतांमध्ये ७ पुरुष, ६ महिलांसह २ बालकांचाही समावेश आहे. दुसरीकडे, या अपघातात ड्रायव्हरसह ४ जण बचावले आहेत. ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार, अपघातासाठी २ इंचाचा छोटा पिन जबाबदार आहे. ही पिन स्टेअरिंग आर्म आणि एक्सेलला जोडणार्या लॉकला जोडलेले आहे.
१५ वर्षीय रमझान महमूद तडवी आणि ५० वर्षीय ड्राइव्हर शेख जहीर शेख बद्रुद्दीन यांना अपघातात कोणतीही दुखापत झालेली नाही. ड्रायव्हर शेख जहीरने दिलेल्या माहितीनुसार, ‘ते रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास धुळ्याच्या नेर तहसीलहून निघाले होते. संपूर्ण ट्रक पपईने भरलेला होता आणि सर्व लोक या पपयांवर बसले होते.
एका छोट्या पिनमुळे ट्रकवरचा ताबा सुटला
ड्रायव्हर शेख याने पुढे दिलेल्या माहितीनुसार, ‘ते बारा वाजता यावल तहसीलच्या किंगगाव येथे पोहोचले. त्यानंतर ट्रक बाजूला लावून सर्वजण तिथे जेवत होते. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर ते रात्री १२:२० च्या सुमारास पुढे जाण्यासाठी निघाले. येथून निघाल्यानंतर काही मिनिटांनंतर हॉटेल मनमंदिरलगतच्या अंकलेश्वर-बुरहानपूर महामार्गावर ट्रकच्या स्टेअरिंग आर्म आणि एक्सेसला जोडणारी लॉकवरील पिन तुटली. ही पिन सुमारे २ इंचाची आहे. ही पिन दर १० वर्षांनी बदलण्याची आवश्यकता असते. पिन तुटल्यानंतर नटमधील बोल्ट निघाला आणि स्टेअरिंग वरचा ताबा सुटला.
रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे सुध्दा उलटला ट्रक
जेव्हा ड्रायव्हरला पिन तुटल्याचे समजलं तेव्हा त्याने ट्रक थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला. ट्रकची गती ही फार जास्त नव्हती आणि रस्त्यावर एक झाड होते, ड्रायव्हरला वाटले की, ट्रक झाडावर आपटल्यावर थांबेल परंतु तसे झाले नाही ट्रक पुढे गेला. रस्त्यावर एक खड्डा होता आणि त्याचदरम्यान ट्रकचा पुढचा चाक त्यामध्ये आले आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटला.
कामगारांच्या मृत्यूबद्दल ट्रक ड्रायव्हरला दु:ख
कामगारांच्या मृत्यूबद्दल दिलगिरी व्यक्त करताना शेखने दिलेल्या माहितीनुसार, “ट्रक पलटी झाल्यावर सर्व कामगार, त्यांची पत्नी व मुले पप्प्याखाली दबली गेली. ट्रकच्या वर झोपलेल्या सर्व लोकांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला आहे. ड्रायव्हरसुद्धा ट्रकमधून खाली पडला, पण त्याला दुखापत झाली नाही.
एका १५ वर्षांच्या मुलाचा वाचला जीव
या अपघातात १५ वर्षीय रमझान महमूद तडवीही बचावला आहे. त्याला कोणतीही दुखापत झालेले नाही. रमजान ट्रकच्या बाजूला झोपला होता आणि ट्रक उलटण्या आधीच रमजान खाली पडला आणि त्याचा जीव वाचला, त्याने सांगितले की, काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचेही रस्ता अपघातात मृत्यू झाला. रमजान व्यतिरिक्त बाबा इरफान शाह आणि सत्तार अकबर तडवी यांचेही प्राण या दुर्घटनेत वाचले आहेत. दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांची नावे
शेख हुसेन शेख (वय ३० रा. फकीरवाडा, रावेर), सरफराज कासम तडवी (वय ३२, केऱ्हाळा), नरेंद्र वामन वाघ (२५, रा. आभोडा), दिगंबर माधव सपकाळे (५५, रा. रावेर), दिलदार हुसेन तडवी (२०, आभोडा), संदीप युवराज भालेराव (२५, रा. विवरा), अशोक जगन वाघ (४०, रा. आभोडा), दुर्गाबाई संदीप भालेराव (२०, रा. आभोडा), गणेश रमेश मोरे (५, रा. आभोडा), शारदा रमेश मोरे (१५, रा. आभोडा), सागर अशोक वाघ (०३, रा. आभोडा), संगीता अशोक वाघ (३५, रा. आभोडा), सुमनबाई शालीक इंगळे (४५, रा. आभोडा), कमलाबाई रमेश मोरे (४५, रा. आभोडा), सबनुर हुसेन तडवी (५३, रा. आभोडा)