रॉबिन डेव्हिडसन / सांगली
पदवीधर वेतनश्रेणीस मान्यता देण्यासाठी एक लाख ७० हजारांची लाच घेणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना रंगहात जेरबंद करण्यात आलं आहे. ही कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. शिक्षण अधिकारी विष्णू मारूतीराव कांबळे आणि अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे या दोन अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात शिक्षकांचे प्रश्न ऐरणीवर असताना ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे.
तक्रारदार व त्यांचे दोन शिक्षक मित्र यांचे पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळणेबाबत प्रस्ताव सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकाऱ्यांकडे दिला होता. सदरचे काम करून देण्यासाठी शिक्षण अधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदार व त्यांचे २ शिक्षक मित्र यांचेकडे प्रत्येकी ६० हजार रूपये प्रमाणे लाच मागितली. याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी २६ एप्रिल २६ एप्रिल २०२२ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता. तक्रारीनुसार २६ एप्रिल २०२२, ०२ मे २०२२ व ०६ मे २०२२ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये शिक्षण अधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदार व त्यांचे शिक्षक मित्र यांचेकडे प्रत्येकी ६० हजार प्रमाणे १ लाख ८० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे दिसून आले. तसेच वाटाघाटींनंतर १ लाख ७० हजार रूपयांवर लाच ठरवल्याचं निष्पन्न झाले.
त्यानंतर कांबळे , शिक्षण अधिकारी व सोनवणे, अधीक्षक यांचे विरूध्द जिल्हा परिषद कार्यालय सांगली तसेच कांबळे यांचे राहत्या घराजवळ सापळा लावण्यात आला. त्यात सदरची लाच रक्कम घेतल्यानंतर कांबळेंच्या राहत्या घरी कांबळे व सोनवणे यांना लाच रकमेसह पकडण्यात आले आहे.
सदरची कारवाई राजेश बनसोडे सो पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक, सुरज गुरव सोो, अपर पोलीस उप आयुक्त / अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुजय घाटगे, पोलीस उप अधीक्षक, विनायक भिलारे पोलीस निरीक्षक, दत्तात्रय पुजारी पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार अविनाश सागर, प्रितम चौगुले, धनंजय खाडे, सलिम मकानदार, सिमा माने, संजय संकपाळ, सजय कलगुटगी, रविंद्र धुमाळ, राधिका माने, भास्कर भोरे यांनी केली आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग , बदाम चौक , सांगली येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३ / २३७३० ९ ५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ८ ९ ७५६५१२६२ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा .
संपर्क:
- मोबाईल अॅप www.acbmaharashtra.net
- फेसबुक पेज- www.facebook.com-maharashtraACB
- वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in