मुक्तपीठ टीम
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात एका १९ वर्षीय आदिवासी तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडीत महिला ही जव्हार तालुक्यातील एका गावातील आहे. आरोपी असलेल्या दोघांनी पीडितेला शेतातील धान्य गोदामात नेऊन तिच्यावर बलात्कार केला व त्यानंतर तिला धमकावण्यात आले की, कुणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारु. आरोपींच्या धमकीमुळे पीडित तरुणी प्रचंड घाबरली. तिने याबाबत कुटुंबियांनाही काही सांगितले नाही. मात्र या घटनेनंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. पीडितेची अवस्था बघून कुटुंबीयांनी तिच्याकडे विचारणा केली असता त्यावेळी पीडितेने कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तरुणीच्या घरच्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसली तरीही या प्रकरणातील एका आरोपीने भीतीपोटी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती जव्हार पोलिसांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
- मिळालेल्या माहितीनुसार, दोघा आरोपींनी आदिवासी तरूणीवर बलात्कार केला.
- जव्हार तालुक्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली.
- जव्हार पोलिसांनी याबाबत मंगळवारी माहिती दिली.
- दोघा जणांनी रविवारी तरूणीवर बलात्कार केला.
- आरोपींनी तरूणीला शेतातील गोदामात नेले.
- तिथे तिच्यावर अत्याचार केले.
- बलात्कारानंतर आरोपींनी पीडित तरूणीला धमकावले.
- याबाबत कुणाकडे वाच्यता केली तर, जीवे मारू, अशी धमकी आरोपींनी तिला दिली.
- आरोपींनी धमकावल्यानंतर पीडित तरूणी प्रचंड घाबरली होती.
- मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने याबाबत कुणालाही काहीही सांगितले नाही.
- मात्र, तिला या घटनेनंतर प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
- पीडितेची अवस्था बघून कुटुंबीयांनी तिच्याकडे विचारणा केली.
- त्यावेळी पीडितेने कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
- कुटुंबीयातील सदस्यांनी तात्काळ या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली.
भीतीपोटी गळफास घेऊन एका आरोपीची आत्महत्या
- जव्हार पोलिसांनी या प्रकरणात सोमवारी आरोपींविरोधात कलम ३७६(२)(ज),३७६(ड),५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
- मात्र अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसली तरीही या प्रकरणातील एका आरोपींन भीतीपोटी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती जव्हार पोलिसांनी दिली.
- तर दुसऱ्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
- पोलिसांना आरोपींबाबत माहिती मिळाली असून, लवकरच त्या आरोपीला अटक करण्यात येईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
- मात्र या प्रकरणी पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.