Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पॉप गायिका रिहानाला ‘शेतकरी’ ट्विटसाठी १८ कोटी!

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा खळबळजनक आरोप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rihana

मुक्तपीठ टीम

 

शेतकरी आंदोलनावरुन भारताच्या विरोधात सोशल मिडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरुन आगपाखड करण्यात येत आहे. पण ही आगपाखड म्हणजे केवळ भारताला व मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीचे रचलेले षडयंत्र होते. तसेच पॉप गायिका रिहानाला एक ट्विट करण्यासाठी स्कायरॉकेट पीआर फर्म कडून १८ कोटी रुपये देण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केला आहे.

 

यांसदर्भात माहिती देताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, प्रिंट या न्यूज वेब पोर्टलवर या षडयंत्राची महिती प्रसिध्द झाल्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजण्याचा काही मंडळींचे षडयंत्र उघड झाले आहे. प्रिंटमधील वृत्तानुसार पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गद्वारे आधी केलेले ट्वीट नंतर डिलीट करण्यात आलेल्या टूलकिटमुळे भारताच्या विरोधात सुरु असलेल्या या आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा खुलासा झाला आहे. या टूलकिटमध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटीला कधी आणि काय ट्विट करायचं आहे, कोणत्या दिवशी शेतकरी आंदोलनात काय घटना घडतील, या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे २६ जानेवारी  रोजी प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील घटनादेखील याच षडयंत्राचा भाग होती असेही या वृत्तामध्ये नमूद करण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

 

हे सर्व प्रकरण अतिशय गंभीर असून याची चौकशी करुन या आंतरराष्ट्रीय षडयंत्रात कोण सहभागी आहेत याचाही तपास झाला पाहिजे अशी आग्रही मागणी करतानाच दादा पाटील म्हणाले की, केवळ राजकीय स्वार्थ साधणारे हे लोकं भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी धोकादायक ठरत आहेत. कारण काही न्यूज रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कॅनडामधील ‘PJF’ नावाची संघटनेचा या आंतरराष्ट्रीय षडयंत्रात सहभाग असल्याचे समोर आले आहे.भारताच्या गुप्तचर संघटनांच्या रडारमध्ये पीएफजे च्या संस्थापकासह स्कायरॉकेट नावाच्या पब्लिक रिशेशंस फर्मचा डायरेक्टर आणि काही इतर लोकांचाही समावेश होता. ही माहितीसुद्धा मिळाली आहे की, पॉप गायिका रिहानाला एक ट्विट करण्यासाठी स्कायरॉकेट कडून १८ कोटी रुपये देण्यात आले होते,अशी माहितीही मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

 

या आंतरराष्ट्रीय लोकांना भारत, कृषी कायदे आणि कृषीविषयक कोणत्याही गोष्टींबद्दल कसलेही ज्ञान नाही. असे सांगतानाच पाटील म्हणाले की, शेतकरी आंदोलनासंदर्भातील ट्विटस भारतावर लांछन लावण्यासाठी व भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक केले जात आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला.


Tags: Farmerpop singerrihannasocial mediaदिल्ली शेतकरी आंदोलनपॉप गायिकारिहानाशेतकरीसोशल मिडिया
Previous Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर न्यायालयाकडून जामीन

Next Post

#शेतकरीआंदोलन अमित शाह शनिवारऐवजी रविवारी राणेंच्या कार्यक्रमास

Next Post
amit shaha

#शेतकरीआंदोलन अमित शाह शनिवारऐवजी रविवारी राणेंच्या कार्यक्रमास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!