मुक्तपीठ टीम
मुंबईतील अंधेरी साकीनाका येथील अत्याचाराची घटना ताजी असताना आता डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. डोंबिवलीतील एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मनपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत २३ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी काही जणांचे नातेवाईक हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
लाजेनं मान खाली घालायला लावणारे हे प्रकरण काय?
- संबंधित घटना डोंबिवलीतील भोपर परिसरातील आहे.
- जानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकराने बलात्कार करत तिचा व्हिडिओ काढला होता.
- या व्हिडिओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत होता.
- हा व्हिडिओ या तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला व तिच्यावर आतापर्यंत २९ जणांनी बलात्कार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे.
- आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने काल रात्री मनपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
- याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन अल्पवयीन मुलांसह २३ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
- विशेष म्हणजे आरोपींमध्ये काही राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे.
गुन्ह्याची ठिकाणे
- बदलापूर
- रबाळे
- मुरबाड
- डोंबिवलीत वेगवेगळ्या ठिकाणी
शालिनी ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- या घटनेनंतर मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे या आक्रमक झाल्या आहेत.
- ट्वीट करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे.
- “डोंबिवलीमधील सामूहिक बलात्काराची घटना अंगावर काटा आणणारी आहे.
- दिल्ली यूपीपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी नाही हे सिद्ध होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजून काय घडणे अपेक्षित आहे?”,असा सवाल शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवर केला आहे.
डोंबिवली मधील सामूहिक बलात्काराची घटना अंगावर काटा आणणारी आहे. दिल्ली यूपीपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी नाही हे सिध्द होण्यासाठी माननीय @CMOMaharashtra यांना अजून काय घडणे अपेक्षित आहे… #डोंबिवलीसामूहिकबलात्कार #डोळेउघडाउद्धवसरकार #महिलासुरक्षावाऱ्यावर
@AUThackeray— Shalini Thackeray (@ThakareShalini) September 23, 2021