मुक्तपीठ टीम
मध्यप्रदेशमधल्या छतरपूर जिल्ह्यात ऑनलाईन खेळात पैसे खर्च केल्यामुळे आई ओरडली आणि या कारणाने १३ वर्षीय मुलाने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी तपासात चिठ्ठी (सुसाईड नोट) सापडली असता, ऑनलाईन खेळात ४० हजार रुपये खर्च केल्याचं चिठ्ठीत लिहिण्यात आलं आहे. चिठ्ठीत मुलाने पालकांची माफी मागितली आहे.
नेमकं काय घडलं?
- वडील विवेक पांडे, आई प्रीती पांडे, मुलगा कृष्णा आणि मुलगी असं चौघांचं कुटुंब आहे.
- कृष्णाचे वडील पॅथॉलॉजी ऑपरेटर आहेत तर आई जिल्हा रुग्णालयात काम करते. कृष्णा इयत्ता सहावीत शिक्षण घेत होता.
- शुक्रवारी ३च्या सुमारास कृष्णाचे वडिल पॅथॉलॉजी लॅबमध्ये होते आणि आई रुग्णालयात होती.
- याचवेळी आईला बॅंकखात्यातून १५०० रुपये कमी झाल्याचा मॅसेज आला.
- आईने लगेचच कृष्णाला फोन करून विचारले असता ऑनलाईन खेळासाठी पैसे काढले असल्याचे कृष्णाने सांगितले.
- आईने कृष्णाला चांगेलच फटकारले.
- आईने ओरडल्यानंतर कृष्णा बराच वेळ खोलीतून बाहेर आला नाही.
- बहिणेने दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला परंतु खोलीतून काहीच प्रतिक्रिया आली नाही.
- बहिणेने आई-बाबांना सांगितले असता, ते लगेचच घरी परतले.
- दरवाजा तोडून पाहिले असता कृष्णाने गळफास घेतल्याचे समोर आले.
मागील काही दिवसांपासून कृष्णा या ऑनलाईन खेळाचा बळी ठरला होता. कृष्णाने यापूर्वी अनेकदा या खेळासाठी पैसे खर्च केले आहेत. मृत्यूनंतर तपास केला असता एक सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये कृष्णाने ४० हजार रुपये खर्च केल्याचे लिहिले होते. सुसाईड नोटमध्ये कृष्णाने पालकांची माफी मागितली आहे.