मुक्तपीठ टीम
जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुकमधील हजारो कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. नोकरी गमावलेल्या लोकांची संख्या किमान १२ हजारांपर्यंत असू शकते असे सांगितले जात आहे. फेसबुकच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी हे प्रमाण १५ टक्के आहे. या प्रकरणाला क्वायट लेऑफ असे नाव दिले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकारी खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी करत आहेत. पुढील काही आठवड्यांत कर्मचार्यांमध्ये १५ टक्के कपात केली जाऊ शकते. याचा अर्थ फेसबुकच्या १२ हजार कर्मचाऱ्यांना लवकरच काढून टाकले जाऊ शकते.
क्वायट लेऑफ म्हणजे काय?
- फेसबुकच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, क्वायट लेऑफमधील लोकांना अशा प्रकारे काढून टाकले जाईल की हे कर्मचारी स्वतः कंपनी सोडत आहेत असे जगाला वाटेल.
- परंतु सत्य हे असेल की त्याला कंपनीतून बाहेर काढले जात आहे.
- गेल्या काही महिन्यांपासून फेसबुकमधील कर्मचारी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कठोर परिश्रम करत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
- विशेषत: कंपनीने नोकरभरती थांबवण्याची घोषणा केल्यापासून मात्र, एवढे करूनही हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकले जात आहे.
सोशल नेटवर्किंग क्षेत्रातील दिग्गज फेसबुकच्या कर्मचाऱ्यांवर काही महिन्यांपासून टांगती तलवार आहे. फेसबुकने नव्या भरतीवर बंदी घातली आहे. यानंतर, मेटाच्या शेअरची किंमत प्रति शेअर ३८० डॉलरच्या जवळ पोहोचली. गेल्या वर्षभरात कंपनीचा शेअर ६० टक्क्यांनी घसरला आहे.
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग म्हणाले की, “पुढील वर्षांपर्यंत लोक कमी करण्याची आमची योजना आहे. अनेक संघ लहान होतील. जेणेकरुन आम्ही आमची उर्जा इतर क्षेत्रात वळवू शकू. अनेक कर्मचाऱ्यांना ३० ते ६० दिवसांची नोटीस देण्यात आली आहे जेणेकरून त्यांना दुसरी नोकरी मिळेल.”