Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत जोडो यात्रा: डॉ. विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली १२ हजार सांगलीकरांचा पदयात्रेत सहभाग

November 15, 2022
in Uncategorized
0
Hingoli photo 9

मुक्तपीठ टीम

भारत जोडो यात्रेचे ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून प्रवेश केल्यानंतर मागील सहा दिवस गावा- गावातून या पदयात्रेला प्रतिसाद वाढत आहे. रविवारच्या विश्रांतीनंतर कळमनुरीतील वस्पनगारा फाटा येथून सकाळी जोश व उत्साहात निघाली. सांगली जिल्ह्यातुन आलेल्या हजारो लोकांच्या साक्षीने सोमवारी सकाळी भारत जोडो यात्रा निघाली. यात्रेचे बोधचिन्ह मुद्रीत केलेले सफेद टीशर्ट आणि सफेद टोपी घातलेल्या १२ हजार सांगलीकरांच्या उत्स्फूर्त गर्दीने रस्ता फुलून गेला होता. माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी पलूस-कडेगाव परिसरातील या कार्यकर्त्यांना भारत जोडो यात्रेत सहभागी केले होते. महाराष्ट्रात यात्रा दाखल झाल्यानंतर देगलूरपासून सांगलीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात्रेत आहेत. आज त्यात पुन्हा भर पडली, त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

Hingoli photo 9

स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतर देशांच्या उभारणीतील पंडीत नेहरूंचे योगदान दर्शविणारे फोटो प्रदर्शन काही ठिकाणी भरली होती. नेहरूंची सातत्याने बदनामी भाजपकडून करण्यात येते, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी नेहरू कुटुंबियांचे देशासाठी योगदान त्यातून दाखवले असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Hingoli photo 6

राहुलजी गांधी यांच्या स्वागतासाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी भव्यदिव्य रांगोळीत त्यांची प्रतिमा साकारण्यात आली होती. त्यासाठी राहुल स्वामी या कलावंताने ४८ तास मेहनत केल्याचे सांगितले. इतर अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठया रांगोळ्या काढल्या होत्या. कुठे रस्त्यावर गुलाबाच्या फुलांची उधळण होती. तर कुठे लहान मुले गुलाबाची फुले आणि तिरंगी झेंडे हातात घेऊन स्वागतासाठी उभी होती, अशा प्रचंड उत्साहाच्या वातावरणात बालदिनी भारतयात्रींचे जंगी स्वागत हिंगोलीमध्ये झाले.

Hingoli photo 5

पंडित नेहरू यांची प्रतिमा पुजन करून जागोजागी आदरांजली वाहण्यात आली होती. सत्र न्यायालय परिसरात तीन वर्षाची प्रदक्षिणा राहुलजींच्या स्वागतासाठी आपल्या सवंगड्यासह उभी होती. तर सर्वधर्म समभावचा संदेश देण्यासाठी हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई धर्माच्या वेशभूषा लहान मुलांनी परिधान केल्या होत्या.

Hingoli photo 3

शिवाजी महाराजांच्या काळात गावोगावी फिरुन शत्रूची माहिती आमच्या कलांच्या माध्यमातून जमा करून राजापर्यंत पोहोचत होतो. पण आता आम्हाला भिक्षा मागून जगावे लागत आहे. आम्हाला राहायला घरे, दारे, शेती, पेंशन मिळावी, या मागणीसाठी वासुदेव आणि गोंधळी पारंपरिक वेशभूषेत राहुजींना भेटण्यासाठी आले होते.

Hingoli photo 9

जुनी पेन्शन पूर्ववत लागू झाली पाहिजे, यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सामील झाले होते. तर पुण्यातून आलेल्या डॉक्टर दिलीप लांडे यांनी दोन क्विंटल फुले रस्त्यावर अंथरली होती. राहुल गांधी समाज जोडण्याचे काम करत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज पंडित नेहरूंच्या जयंतीनिमित्त गुलाबांच्या फुलांनी यात्रेकरूंचे स्वागत करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 


Tags: Bharat Jodo Yatradr. vishwajeet kadamMaharashtrasangliडॉ. विश्वजित कदमभारत जोडो यात्रा
Previous Post

सरन्यायाधीश चंद्रचुडांची स्पष्टोक्ती: “माझ्याकडून खूप अपेक्षा, पण मी चमत्कारासाठी नाही आलो!”

Next Post

पांढऱ्या रंगाचेच कपडे का, दाढी का ठेवता? मुलांचे कुतूहल अन् मुख्यमंत्र्यांची खुमासदार उत्तरे!

Next Post
बालदिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री रमले मुलांमध्ये 2

पांढऱ्या रंगाचेच कपडे का, दाढी का ठेवता? मुलांचे कुतूहल अन् मुख्यमंत्र्यांची खुमासदार उत्तरे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!