मुक्तपीठ टीम
सोमवार २९ नोव्हेंबरपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी १२ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेचे अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेंदीं यांचा समावेश आहे. निलंबित खासदारांना अधिवेशनात सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही.
११ ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खासदारांनी त्यांच्या हिंसक वर्तनाने आणि सुरक्षा कर्मचार्यांवर जाणूनबुजून हल्ले करून सभागृहाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवली आहे, असे निलंबनाच्या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. या शिवसेनेच्या २ खासदारांना निलंबित करण्यात आली आहे. ही कारवाई हिवाळी अधिवेशनासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे १२ खासदारांना सोमवारपासून सुरु झालेल्या अधिवेशनात सहभागी होता येणार नाही.
राज्यसभेतून १२ खासदार निलंबित
१२ राज्यसभा खासदारांना सभागृहात शिस्त भंग केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.
- शिवसेना-अनिल देसाई
- शिवसेना- प्रियंका चतुर्वेदी
- सीपीएम- इलामाराम करीम
- काँग्रेस- फुलो देवी नेताम
- काँग्रेस- छाया वर्मा
- काँग्रेस- रिपुन बोरा
- काँग्रेस- राजमणी पटेल
- काँग्रेस- सय्यद नासिर हुसेन
- काँग्रेस- अखिलेश प्रसाद सिंग
- सीपीआयचे बिनय विश्वम
- तृणमूल काँग्रेस- डोला सेन
- काँग्रेस- शांता छेत्री