Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात दहावी बारावीच्या परीक्षा जाहीर

January 22, 2021
in घडलं-बिघडलं
0
10th-12th Exam

मुक्तपीठ टीम

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत तारखांची घोषणा केली. बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल  ते २९ मे २०२१ च्या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

यंदा एचएससी (इ. १२ वी) बोर्डाची परीक्षा येत्या २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल.#hscexam pic.twitter.com/5bMXXwevNd

— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 21, 2021

 

निकाल कधी?

 

बारावीचा निकाल अंदाजे जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. तर दहावी परीक्षेचा निकाल आँगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.

 

कोरोना संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करुन परिक्षेचे आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

एसएससी (इ. १० वी) बोर्डाची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल.#sscexams2021#sscexam pic.twitter.com/AXhFsbo9lf

— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 21, 2021

 

“कोरोनाच्या काळात अनेक शालेय विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. तसेच त्यासाठी विशेष मोहीमही राबविण्यात येणार आहे”, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. विद्यार्थी व पालकांनी या संदर्भात काही तक्रारी असतील तर स्थानीक शिक्षण अधिकारी वर्गाकडे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

 

या पत्रकार परिषदेत शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील आणि सहाय्यक संचालक दिनकर टेमकर उपस्थित होते.


Tags: 10thExam12thExamDates announcedSchool Education Minister Varsha Gaikwadvarsha gaikwadदहावी परीक्षाबारावी परीक्षा
Previous Post

#मराठाआरक्षण “एमपीएससीची याचिका का ते लवकरच समोर येईल!”

Next Post

लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ठाकरेंनाही लसीची शक्यता!

Next Post
PM

लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ठाकरेंनाही लसीची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!