मुक्तपीठ टीम
किसान रेल्वेने आपली सेवा सुरू केल्याच्या ७५ दिवसांमध्ये मराठवाड्यातून १०० वी फेरी पूर्ण केली आहे. आतापर्यंत ३३ हजार ८८५ टन कांदा आणि १९० टन द्राक्षे वाहून बाजारपेठेपर्यंत नेली आहेत.
“किसान रेल्वे नांदेड विभागातील नगरसोल स्टेशन येथून निघते. तिने या हंगामात भारताच्या पूर्व आणि ईशान्येकडील राज्यात कांदे व द्राक्षे पुरविली. या विशेष रेल्वे सेवेमुळे मराठवाड्यातील कृषी क्षेत्राला चालना मिळेल, असे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सी. राकेश यांनी सांगितले.
केंद्रीय योजनेअंतर्गत किसान रेलमधून वाहतुकीसाठी शेतकरी व व्यापाऱ्यांना ५०% दर सवलत दिली जाते. कृषी उत्पादनांसाठी बिनत्रासाचा व किफायतशीर वाहतुकीचा पर्याय म्हणून किसान रेल्वेकडे पाहिले जाते. शेतकरी, व्यापारी व मालवाहतूक करणार्यांसाठी किसान रेल्वे फायद्याची ठरत आहे. नांदेड विभागातील पहिली किसान रेल्वे सेवा यावर्षी ५ जानेवारीला आसाम मधील नगरसोल ते न्यू गुवाहाटी – मराठवाडा दरम्यान सुरू झाली. मालदा टाऊन, न्यू जलपाईगुरी, अगरताळा, बैहाटा, नौगछिया, डांकुनी, धुपगुरी, चितपूर, संक्राईल आणि फतुहा या ठिकाणी किसान रेल्वेने मराठवाड्यातून शेतीमालाची वाहतूक केली आहे.
पाहा व्हिडीओ: