मुक्तपीठ टीम
कोरोना काळात तापावर लोकप्रिय अचानक अतिलोकप्रिय झालेली गोळी म्हणजे डोलो६५०. डॉक्टर कोरोना रुग्णांना प्राथमिक उपचार म्हणून ‘डोलो ६५०’ गोळी देत होते. याच डोलो ६५०ची विक्री वाढवण्यासाठी डॉक्टरांवर १००० कोटी रुपये खर्च केल्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे सात दिवसात उत्तर मागीतलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
- डोलो ६५० औषधाची विक्री वाढवण्यासाठी फार्मास्युटिकल कंपन्यांनी डॉक्टरांवर १००० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
- फेडरेशन ऑफ मेडिकल अॅण्ड सेल्स रिप्रेजेंटेटिव्ह असोसिएशनकडून वकील सजंय पारिख यांनी न्यायालयात बाजू मांडली.
- संजय पारिख यांनी सर्वोच्च न्यायालयात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या रिपोर्टचा हवाला दिला.
- पारिख म्हणाले की,’तापाच्या रुग्णांना उपचारासाठी ‘डोलो ६५०’ या गोळीचा सल्ला देण्यासाठी डॉक्टरांना तब्बल एक हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे गिफ्ट दिले.
- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आश्चर्य व्यक्त केले…
- संजय पारिख यांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आश्चर्य व्यक्त केले.
- संजय पारिख यांना न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, ‘तुम्ही जे म्हणताय ते ऐकायला चांगलं वाटत नाही.
- ही तीच गोळी आहे, जी कोरोना काळात मी घेतली होती.
- ही गोळी घेण्याचा सल्ला मला डॉक्टरांनी दिला होता.
- जर हे खरं असेल तर ही गंभीर बाब आहे.’
न्यायालयाने केंद्राकडून १० दिवसांत उत्तर मागितले…
डोलो ६५० ची विक्री वाढवण्यासाठी डॉक्टरांना १००० कोटी रुपये देण्याच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला १० दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.