मुक्तपीठ टीम
भारतात धर्माचं अवास्तव स्तोम माजवणाऱ्यांच्या बेफिकीरीतून कोरोना संसर्ग पसरण्याची नवी घटना उघडकीस आली आहे. पहिल्या लाटेत दिल्लीतील तब्लिगी संमेलन, त्यानंतर कुंभमेळा आणि आता केरळमधील पाद्री संमेलन झाले आहे. केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच गेल्या महिन्याच मुन्नारमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करत पाद्र्यांचे वार्षिक संमेलन आयोजित करण्यात आले होते. ते आता कोरोना संमेलन ठरले आहे. संमेलनात सहभागी झालेले चर्च ऑफ साउथ इंडियाचे शंभरापेक्षा जास्त पाद्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या दोन पाद्र्यांचा मृत्यूही झाला आहे. केरळ पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, कोरोकोणम येथील सीएसआय मेडिकल कॉलेजमध्ये संसर्ग झालेल्या ४० पाद्रींवर उपचार सुरू आहेत. केरळमधील इडुक्कीचे जिल्हाधिकारी एच. दिनेश म्हणाले, “या कार्यक्रमास जिल्हा प्रशासनाकडून मान्यता घेण्यात आलेली नाही. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. आम्ही आयोजकांवर कठोर कारवाई करू”.
कोरोना संसर्गाचे अमर, अकबर आणि अँथनी!
- भारतात कोरोना संसर्गाचा इजा बिजा तिजा झाला आहे.
- आधी तब्लिगी, नंतर कुंभ आणि आता पाद्री संमेलन झाला आहे.
- भारतात धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनामुळे कोरोना संसर्ग पसरण्याची ही पहिली घटना नाही.
- कोरोना पहिल्या लाटेत दिल्लीत तब्लिगी संमेलन झाले होते, त्यात जगभरातून आलेल्या अनेक मुसलमान धर्मगुरुंना कोरोनाची लागण झाली होती.
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुंभमेळ्यात अनेकांना कोरोनाची बाधा झाली. हिंदू धर्मातील मोठे पद असणाऱ्या एका महामंडलेश्वरांचा मृत्यूही ओढवला.
सुरक्षा नियमांचा फज्जा
- पाद्री संमेलनाचा कार्यक्रम १३ ते १७ एप्रिल दरम्यान झाला.
- यावेळी कोरोनाचे सर्व सुर७ नियम तोडण्यात आले
- ३५० पाद्री तसेच इतरांनी कार्यक्रमात भाग घेतला.
- काही तरुण पाद्रीनीं कोरोना काळात झालेल्या कार्यक्रमाबद्दलही प्रश्न उपस्थित केले.
- त्यांना चर्च प्रशासनाने शिस्तभंगाच्या कारवाईची धमकी देऊन शांत केले.
चर्चच्या प्रवक्त्याने मात्र अशा संसर्गाचा इंकार केला आहे. हे सर्व चर्चची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि, प्रवक्त्याने कबूल केले की चर्चच्या दोन पाद्र्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला.
कोरोनामुळे दोन पाद्रींचा मृत्यू
- कोरोना झालेल्यांपैकी चर्च ऑफ साउथ इंडिया (सीएसआय) चे साउथ केरळ बिशप फादर धर्मराज रसलाम यांनाही संसर्ग झाला होता.
- ५२ वर्षीय फादर बिजुमन आणि ४३ वर्षीय रेव्हन शाईन बी राज, या कार्यक्रमास उपस्थित होते, गेल्या आठवड्यात कोरोनाने त्यांचा मृत्यू झाला.
- चर्चमधील काही लोकांनी या संसर्गाची पुष्टी केली आहे.
मुख्यमंत्री पिनराई म्हणाले प्रकरण दुर्दैवी
- मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी हे प्रकरण दुर्दैवी असल्याचे म्हटले.
- ते म्हणाले की त्यांनी जिल्हा प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत.
- ते म्हणाले की, जेव्हा कोरोना परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, तेव्हा अशाप्रकारचे आयोजन करू नयेत.