मुक्तपीठ टीम
शिरुर मतदार संघातील तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्यालगत असलेल्या त्रिमूर्ती कार्यालयात १०० खाटांचे कोरोना सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत १६ गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी त्वरित कोरोना सेंटर उभी करण्याची मागणी होत होती. संबंधित समस्या ऐकून त्यावर तात्काळ सूचना आमदार अॅड् अशोक बापू पवार यांनी दिल्या. त्यानुसार प्रांत संतोषकुमार देशमुख, सुजाता अशोक पवार व तळेगावच्या पदाधिकाऱ्यांसोबत या विषयी चर्चा केली.
यावेळी तहसीलदार श्रीमती शेख, बी.डी.ओ. नलावडे, टि.एच.ओ. मोरे, शिरूर पंचायत समितीच्या सभापती मोनीकाताई हरगुडे, जिल्हा परिषद सदस्या मांढरेताई, जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडीत अप्पा दरेकर, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वासकाका ढमढेरे, संचालक ॲड. सुदीप गुंदेचा, तळेगावच्या सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, पत्रकार रवी पाटील तसेच इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.