मुक्तपीठ टीम
देशभरात थैमान घालणारा कोरोना आता संसदेपाठोपाठ सर्वोच्च न्यायालयातही जाऊन पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयातील एकूण १० न्यायाधीशांना आणि ४०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. संसर्गाचे प्रमाण ३० टक्क्यांवर पोहोचल्याचे सांगितले जात आहे. सौम्य लक्षणे असलेल्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सरन्यायाधीश या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
१० न्यायाधीश आणि ४०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
- सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयातील ३२ न्यायाधीशांपैकी आतापर्यंत १० न्यायाधीश कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र, यातील दोन न्यायाधीश आता बरे होऊन परतले आहेत.
- तर आठ न्यायाधीश अद्याप रजेवर आहेत.
- न्यायाधीशांव्यतिरिक्त मोठ्या संख्येने न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित न्यायालयीन कर्मचाऱ्यांची संख्या ४०० वर पोहोचली आहे.
- डॉ. श्यामा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे वैद्यकीय पथक संक्रमित न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी चोवीस तास काम करत आहे.
- दररोज सुमारे १००-२०० आयटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत.
- संसर्ग दर सातत्याने सुमारे ३०% आहे.
आठवडाभरात बाधित न्यायाधीशांची संख्या दुप्पट
- वैद्यकीय पथकातील डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह
- सर्वोच्च न्यायालयातील CGHS केंद्रातील पाचपैकी तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.
- त्यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
- त्यामुळे डॉ.गुप्ता यांच्या टीमवर दबाव वाढला आहे.
- ९ जानेवारी रोजी चार न्यायाधीशांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
- आठवडाभरात बाधित न्यायाधीशांची संख्या दुप्पट झाली आहे.
सरन्यायाधीश रमणांसाठी ही नवीन चिंतेची बाब
- ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) अंतर्गत, जेव्हा सलग दोन दिवस सकारात्मकता दर ५% पेक्षा जास्त असेल तेव्हा रेड अलर्ट घोषित केला जातो.
- गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांमध्ये सकारात्मकता दर सुमारे २५% राहिला आहे.
- सरन्यायाधीश रमणा यांच्यासाठी ही नवीन चिंतेची बाब आहे.
- ते सर्व न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवून असतात.