Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

शिवरायांच्या कर्तृत्वाची दहा वैशिष्ट्ये

June 6, 2021
in featured, प्रेरणा
0
शिवरायांच्या कर्तृत्वाची दहा वैशिष्ट्ये

डॉ. गिरीश जाखोटिया

 

नमस्कार मित्रांनो !

‘शिवराज्याभिषेक सोहळा दिवसा’च्या निमित्ताने तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

आपला महाराष्ट्र हा देशाचं सांस्कृतिक – सामाजिक नेतृत्व करतो, कारण आपल्या बुद्धीचं भरण-पोषण शिवरायांच्या विचारांनी झालेलं आहे. परंतु आज बरीच राजकारणी मंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते शिवरायांच्या दिग्गज व्यक्तीमत्वाचा फक्त राजकीय वापर करतात. आजची बहुतांश रयत सुद्धा ह्रदयात शिवबांबद्दल प्रचंड आदर व प्रेम बाळगते परंतु त्यांच्या गुणवैशिष्ट्यांना प्रत्यक्ष जगण्यात नीटपणे अंगिकारत नाही. २१ व्या शतकात शिवरायांच्या आचार – विचारांची प्रचंड गरज असताना आम्ही त्यांच्या स्मरणार्थ फक्त उत्सव साजरे करतो. शिवरायांच्या व्यक्तिमत्वात व कर्तृत्वात उदात्तपणे जगण्याच्या चारही अंगांचं पूर्ण दर्शन घडतं – बौद्धिक प्रज्ञाशीलता, सांस्कृतिक आनंद, सामाजिक समता व रयतेसाठीची भौतिक संपदा. आज या चारही अंगांना दहा महत्त्वाच्या वैशिष्ट्यांद्वारा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात.

शिवरायांच्या कर्तृत्वाचं सर्वाधिक महत्वाचं वैशिष्ट्य होतं ‘रयतेबद्दलचं असीम प्रेम व त्यासाठी लोककल्याणकारी राज्यासंबंधीची’ अमर्याद बांधिलकी. सहकारी, सैनिक, प्रशासकीय अधिकारी, नातेवाईक – मित्र इ. सर्वांना ते प्रत्येक वेळी रयतेची आठवण करून द्यायचे. रयत म्हणजे शेतकरी, कष्टकरी, दुकानदार, शिक्षक, सैनिक व त्यांची कुटुंबे इत्यादी. सैनिकांनी ‘कुटुंबवत्सल’ असण्याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. लढाईची मोहीम नसताना सैनिकांनी कुटुंबात राहून शेती करावी, हा त्यांचा आग्रह असायचा. मोहिमेत शत्रूच्या रयतेवरही अन्याय होता कामा नये, हे माणुसकीचे तत्त्व पाळले जायचे. ‘रयतेसाठी राज्य’ राबविताना त्यांच्या व्यक्तीमत्वाचं दुसरं मोठं वैशिष्ट्य दिसतं ते ‘ध्येयावरील संपूर्ण निष्ठे’चं. यासाठी कोणताही संदेह न बाळगता त्यांनी मोजक्या सवंगड्यांसह स्वराज्य – उभारणीचा प्रण केला. बसता – उठता “शिव – शाहू – फुले – आंबेडकर” अशी माळ जपणारे पुढारी स्वतःची खासगी वतने सांभाळण्यासाठी रातोरात निष्ठेला तिलांजली देतात तेव्हा त्यांची मला कीव येते.

 

औरंगजेबाच्या दरबारात त्याला व त्याच्या सरदारांना रोखठोक ऐकवणारे शिवराय कुठे नि आजची राजकीय बांडगुळे कुठे !
तिसरं वैशिष्ट्य धैर्यशील – साहसी असण्याचं. कपटी नि बलशाली अफझलखानाला सामोरं जाणं सोपं नव्हतंच. आग्र्यातून सुटका करून घेण्याचं साहसही सोपं नव्हतं. परंतु या साहसामागे रयतेचे आशीर्वाद, ध्येयाबद्दलची सजगता आणि उत्तम नियोजन होते. आज शेतकऱ्यांच्या मुलांशी मी जेव्हा बोलतो तेव्हा त्यांचा प्रामाणिकपणा दिसतो पण साहस जाणवत नाही. साहसच नसेल तर नियोजनाचं प्रयोजन कसं होणार ? मराठा समाजाचे बहुतेक प्रश्न हे ध्येय, साहस आणि नियोजनाने सोडवता येऊ शकतात. ‘नियोजन’ व त्याची अचूक अंमलबजावणी हे चौथं वैशिष्ट्य अत्यंत महत्त्वाचं. यासाठी ‘टीम’ महत्त्वाची. टीम मधील सहकाऱ्यांना जपताना यशाचं श्रेय त्यांनाही देणं महत्वाचं. शिवराय आग्र्यातून सुटून स्वराज्यात परतण्याचा एकूण कालखंड हा नऊ महिन्यांचा होता. एवढ्या मोठ्या कालखंडात स्वराज्याची प्रशासकीय घडी कुठेही विसकटली नव्हती. शिवरायांची टीम ध्येयावरील त्याच आस्थेने व नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत होती. आमच्याकडे आज महाराष्ट्रात ‘नेता’ कुठे जरा कमी पडू लागला की सहकाऱ्यांचं पक्षांतर सुरु. या ‘पळपुट्यां’ना स्वराज्याचे वारसदार कसं म्हणायचं ?

शिवरायांच्या व्यक्तीमत्वाचं पाचवं वैशिष्ट्य होतं चाणाक्षपणाचं व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या लवचिकतेचं. औरंगजेबाचा हुशार व पराक्रमी राजपूत सरदार मिर्झाराजे जयसिंग जेव्हा महाराष्ट्रात कामगिरीवर आला तेव्हा योग्य ती लवचिकता दाखवत त्याच्याशी शिवबांनी पुरंदरचा तह केला. यात उगाच भावनाशील न होता आपल्या व स्वराज्याच्या अस्तित्वाला जपण्यासाठी शिवरायांनी चाणाक्षपणा दाखविला. आज मी तालुका – खेडी – शहरांमधला मराठा युवक जेव्हा पहातो तेव्हा तो मला अधिक भावनाशील व कमी व्यवहारी वाटतो. स्वराज्य वाढविण्यासाठी धनाची गरज असते नि म्हणून अत्यंत चोख अशा व्यवहारीपणाने शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली होती. धनाढ्यांना स्वराज्यासाठी चुचकारताना राजकारणात त्यांची कुठेही ढवळाढवळ होऊ दिली नाही. आज बलाढ्य उद्योगपती ठरवतात कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळावं ! शिवबांनी राजकीय मुत्सद्देगिरीने व व्यवहारी रहात पोर्तुगीजांना तळकोकणात व्यापाराची अनुमती दिली व त्या मोबदल्यात त्यांच्याकडून जहाज – बांधणीचे तंत्रज्ञान घेतले. इथे सहावं वैशिष्ट्य दिसतं ते ‘दूरदर्शीपणा’चं. समुद्रमार्गे स्वराज्याला धोका संभवतो हे शिवबांनी जाणलं नि म्हणून सागरी आरमाराची त्यांनी बांधणी केली.

सर्वांसाठी ‘समभाव’ हे सातवं वैशिष्ट्य खूपच मोठं. यासाठी न्याय करताना ते ‘आपला – परका’ असा भेदभाव करीत नसत. अपराधांसाठी त्यांनी जवळच्या नातेवाईकांनाही कठोर शिक्षा ठोठावल्या होत्या. आजच्या महाराष्ट्रात कुणी सत्ताधीश फाईल काढून घाबरवू लागला की ढाण्या वाघाचंही मांजर होतं नि मग आपसुकच पक्षांतराने वाल्याचा वाल्मिकी केला जातो. अबब, आज किती ती राजकारणातील घसरण ! शिवबांचा ‘सामाजिक समभाव’ तर अद्वितीय होता. अठरापगड जातींचे व धर्मांचे शिलेदार त्यांनी स्वराज्यबांधणीच्या अजस्त्र कार्यात जोडले होते. स्वराज्यावरील असीम निष्ठेमुळेच शिवबांचा एक मावळा हा आदिलशाहीच्या पन्नास पगारी सैनिकांना भारी पडायचा. आजच्या महाराष्ट्राची एकूणच घसरण ही राजकीय व्यभिचारामुळे वेगाने होते आहे. “महा + राष्ट्र” पूर्वपदावर आणण्यासाठी येथील प्रत्येक ‘मरहट्ट्या’ला सामाजिक समतेवर प्रचंड काम करावे लागेल. “सर्वांसाठी अर्थकारण” हे शिवरायांच्या कर्तृत्वाचं आठवं वैशिष्ट्य होतं. प्रत्येक कुणबी हा समृद्ध, समाधानी व सुखी व्हावा म्हणून शेतीच्या एकूणच नियमनाचे विस्तृत कायदे त्यांनी अमलात आणले होते. याबाबतीतली त्यांची कळकळ ही अमर्याद होती. औरंगजेबाने हिंदूंवर जिझिया कर लाऊ नये म्हणून शिवरायांनी त्यांस पत्र लिहिले होते. खाली दक्षिणेत आपला भाऊ व्यंकोजीराजे यांस ते रयतेसाठीच्या अर्थकारणाचे संक्षिप्त धडे वेळोवेळी लिहून पाठवत असत. आज भारत देशी ‘सर्वांसाठी कोवीडची लस’ आयोजिताना आमची दमछाक होते. आम्ही ‘युगपुरुषां’ची पूजा फक्त करतो, त्यांचं कार्य पुढे नेत नाही.

 

“कल्पकता” ही शिवरायांच्या प्रत्येक महत्वाच्या मोहीमेचं वैशिष्ट्य होतं. शाहिस्तेखानावरील सर्जिकल स्ट्राईक असो किंवा प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाला बोलावण्याची युक्ती असो अथवा इंग्रजांना धाकात ठेवण्याचे कसब असो, प्रत्येकवेळी ही कल्पकता दिसून येते. आजचा महाराष्ट्रीय तरूण हा एकेकट्याने खूप कल्पक असतो पण त्या कल्पक विचाराला पुढे नेण्यासाठी त्याला संस्थात्मक पाठबळ मिळत नाही. बऱ्याचदा मी असंही पाहिलंय की तालुक्यातील तरुणांना नव्या कल्पनांवर काम करण्याची उमेदच नसते. संधीची वाट न पाहता कल्पकतेने संधी निर्माण करावी लागते. शिवरायांच्या काळात बरेच मराठा सरदार नोकऱ्या करायचे. स्वराज्याची इच्छा, कल्पना व ध्येय हे शहाजी राजांचं, जिजाऊंचं नि शिवरायांचं फक्त होतं सुरूवातीला. या ध्येयाला शिवरायांनी सहकाऱ्यांच्या सोबतीने मूर्त स्वरूप दिलं. आजचे बहुतेक ‘किसानपुत्र’ हे जाती व राजकीय विचारांनी दुभंगलेले असल्याने मराठी माणसांची मोठी सामुदायिक शेती होत नाही. शिवबांच्या कर्तृत्वाचं दहावं व अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं विवेक व विज्ञानाच्या उपयोगाचं. शिवरायांनी अंधश्रद्धांना व चातुर्वर्ण्यव्यवस्थेच्या अन्यायी रूढींना कधीच आश्रय दिला नव्हता. महाराष्ट्राला आज त्याच विवेकाची व विज्ञानाची गरज आहे !

Girish Jakhotia -11

(डॉ. गिरीश जाखोटिया हे उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार आहेत. तसेच ते ज्येष्ठ लेखक, विचारवंत असून समकालिन घटनांवर ते अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक भाष्य करतात.)

 

ई-मेल – girishjakhotiya@gmail.com

Copyright © jakhotiya.com
Right to change/reproduce withheld per IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.


Tags: Chhatrapati Shivaji MaharajDr Girish Jakhotiaraigadshivaji maharajछत्रपती शिवाजी महाराजडॉ. गिरीश जाखोटियारायगड
Previous Post

लुडो खेळाविरोधात न्यायालयात याचिका, कौशल्याचा नाही भाग्याचा खेळ! जुगाराचा आरोप!

Next Post

कोल्हापुरात १६ जूनला पहिला मराठा आरक्षण मोर्चा!

Next Post
sambahji Chhatrapati 6-6-21

कोल्हापुरात १६ जूनला पहिला मराठा आरक्षण मोर्चा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!