मुक्तपीठ टीम
दक्षिण मुंबईतील एका नेत्याला गोत्यात आणण्यासाठी त्याच्या गाडीत ड्रग प्लांट करण्याचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. आपल्या भावाला त्या नेत्याऐवजी स्थानिक राजकारणात पुढे आणण्यासाठी कटात सहभागी झालेला एक आऱोपीही जेरबंद झाला आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी नारकोटिक सेलने ही कारवाई केली आहे.
एएनसीच्या आझाद मैदान युनिटने गेल्या शुक्रवारी दोन आरोपींना १५० ग्रॅम मेफेड्रॉनसह अटक करण्यात आली. त्यांच्या जबाणीत अब्दुल अजीज उर्फ अझ्झूचा उल्लेख झाला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. कट रचल्याप्रकरणी आयपीसी कलम १२०-बी आणि एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांचा समावेश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आसिफ सरदार आणि अझू हे दक्षिण मुंबईत अंमली पदार्थांच्याविरोधात मोहीम राबविणार्या एका स्वयंसेवी संस्थेचे सदस्य आहेत.
अझ्झूने पोलिसांना सांगितले की, बिल्डर्स लॉबी आणि इतर व्यावसायिक दक्षिण मुंबईच्या सदर नेत्याच्या हस्तक्षेपामुळे नाराज आहेत. त्यामुळे त्या नेत्याचे राजकीय नुकसान करण्यासाठी त्यांनी कट रचला. त्यात तो आपल्या भावाच्या राजकीय स्वार्थासाठी सामील झाला.