स्कॉर्पियन पाचवी पाणबुडी वागीर गुरुवारी मुंबईच्या माझगाव डॉक येथिल नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या पाणबुडीला नौदलाला सोपवले. प्रोजेक्ट-७५ अंतर्गत भारताने पाच स्कॉर्पियन पाणबुड्या तयार केल्या आहेत. आयएनएस वागाशीर सहाव्या पाणबुडीवर काम प्रगतीपथावर पोहोचले आहे. स्कॉर्पियन पाणबुडीचा प्रकल्प माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड आणि फ्रेंच कंपनी नेवल ग्रुपचा आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये ६ पाणबुडी तयार करण्यासाठी २००५ मध्ये करार करण्यात आला होता.
या पाणबुड्यांमुळे नौदलाचे सामर्थ्य वाढेल. या सर्व स्कॉर्पियन पाणबुड्या अॅन्टी-सरफेस वॉरफेअर, अॅन्टी-सबमरीन वॉरफेयर, गोपनीय माहिती गोळा करणे, खाण घालणे आणि टेहळण्याचे काम करू शकतात.
डिसेंबर २०१७ मध्ये नौदलाच्या या श्रेणीतील पहिल्या पाणबुडी ‘कलवरीचे’ जलावतरण झाले. आयएनएस खांदेरी (जानेवारी २०१७) आणि आयएनएस करंज (३१ जानेवारी २०१८) यापूर्वीच भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत. या दोन्ही प्रगत पाणबुड्या आहे.