थोडक्यात महत्वाचं – 1. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना भेटल्याचा भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांचा दावा. पवारांनी वडिलकीच्या नात्याने लक्ष घालण्याची विनंती केल्याचेही सांगितले. आजवर शांततेत मोर्चे निघाले पण आरक्षण मिळाले नाही तर काय होईल ते सांगता येत नाही, असा राज्य सरकारला इशारा. 2. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मनसेसोबत युतीसाठी तयार असल्याची भूमिका, पण अमराठी नको, ही भूमिका मनसेने बदलावी, अशी अट मनसेने ही भूमिका सोडली तर मनसेबरोबर युती होऊ शकते, असे यापूर्वीही सांगितल्याची आठवण. 3. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली, लोकसभेत गोंधळ; शेम-शेम च्या घोषणा 4. कोरोना लसीकरण मोहिम संपताच देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू केला जाणार असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा 5. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ६ हजार १०७ झाले कोरोनामुक्त, २५ रुग्णांचा मृत्यू, तर ३ हजार २९७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३० हजारांपर्यंत खाली आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९५.८४ टक्क्यांपर्यंत पोहचले.