Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी दोन चॅनेल्सच्या मालकांना जामिन

December 22, 2020
in कायदा-पोलीस
0
32 हजार कोटींचा धंदा, टीआरपी युद्धाचा खरा अजेंडा !

मुंबई :- टीआरपी घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोन खाजगी चॅनेल्सच्या मालकांना स्थानिक न्यायालयाने गुरुवारी प्रत्येकी पन्नास हजाराचा जामिनावर सोडून दिले. त्यात बॉक्स सिनेमाचे मालक नारायण नंदकिशोर शर्मा आणि फक्त मराठीचे मालक शिरीष सतीश पत्तनशेट्टी यांचा समावेश आहे. टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशाल भंडारी याला अटक केली होती, त्याच्या चौकशीत बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठीचे चॅनेल्स मालक नारायण शर्मा आणि शिरीष पत्तनशेट्टी यांचा सहभाग उघडकीस आला होता.

टीआरपी वाढविण्यासाठी या दोघांनी हंसा कंपनीच्या काही माजी अधिकार्‍यांशी हातमिळवणी करुन हा घोटाळा केल्याचे उघडकीस येताच ९ ऑक्टोंबरला या दोघांनाही नंतर पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर ते दोघेही न्यायालयीन कोठडीत होते, त्यानंतर त्यांनी स्थानिक न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या जामिन अर्जावरील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली आणि नारायण शर्मा व शिरीष पत्तनशेट्टी यांना न्यायालयाने प्रत्येकी ५० हजाराच्या जामिनावर सोडून दिले.

याच गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नारायण शर्मा, शिरीष पत्तनशेट्टी, विशाल भंडारीसह बोमपेल्लीराव नारायण मिस्त्री, विनय राजेंद्र तित्रपाठी, उमेश चंद्रकांत मिश्रा, रामजी दुधनाथ शर्मा, दिनेशकुमार पन्नालाल विश्‍वकर्मा, हरिष कमलाकर पाटील आणि अभिषेक भजनदास कोलवडे ऊर्फ अजीत ऊर्फ अमीत ऊर्फ महाडिक यांचा समावेश आहे. यातील अभिषेक हा सध्या पोलीस तर इतर सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत होते, त्यापैकी दोघांना गुरुवारी न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. या सर्वांच्या चौकशीत एका चॅनेल्सच्या बँक खात्यात तीन महिन्यांत सत्तर ते ऐंशी कोटी रुपये जमा झाल्याचे उघडकीस आले होते, या संपूर्ण व्यवहाराची सध्या गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. दुसरीकडे याच गुन्ह्यांत रिपब्लिक टिव्ही, न्यूज नेशन आणि महामूव्ही चॅनेलचे मालक, चालक तसेच चॅनेल्सशी संबंधित व्यक्तींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.


Tags: ScameTRP
Previous Post

काळ बदलतोय…माध्यमांची कायाही बदलणारच…आत्मा हरवू नये!

Next Post

वांद्रे येथे व्यावसायिकाचे अपहरण करुन लुटमार

Next Post
वांद्रे येथे व्यावसायिकाचे अपहरण करुन लुटमार

वांद्रे येथे व्यावसायिकाचे अपहरण करुन लुटमार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!