मुक्तपीठ टीम
सर्वात जास्त लोकप्रिय असलेले सोशल नेटवर्किंगचे माध्यम म्हणजे फेसबुक… आता लवकरच फेसबुकवरील कन्टेन्ट वापरकर्त्यांसाठी कमाईचे साधन ठरणार आहे. तुम्ही फेसबुकवर पोस्ट्स आणि फोटो शेअर करण्याबरोबरच उत्पन्नही मिळवू शकणार आहेत. कंपनीने शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ कन्टेन्टवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामध्ये फेसबुक व्हिडिओ बनवणाऱ्या वापरकर्त्यास दाखवलेल्या जाणाऱ्या जाहिरातींद्वारे पैसे कमवता येणार आहेत.
फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, याचे सुरूवातीचे स्वरुप छोटे असणार आहे. परंतु, लवकरच कन्टेन्ट क्रिएटर्ससाठी या फीचर सुविधेचा विस्तार वाढला जाण्याची अपेक्षा आहे. जेणेकरून त्यात अधिकाधिक कन्टेन्ट क्रिएटर्स जोडले जाऊ शकतील. कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी पात्रता मापदंडही अपडेट केलेले आहेत, जेणेकरून अधिक कन्टेन्ट क्रिएटर्स या स्ट्रीम जाहिरातींसह त्यांच्या व्हिडिओंवर कमाई करू शकतील.
फेसबूकवर कशी मिळणार कमाई?
• नवीन अपडेटनंतर व्हिडीओ बनविणार्या वापरकर्त्यांना पैसे कमवण्याची संधीही मिळेल.
• फेसबूकसाठी किमान एक मिनिटाचा व्हिडिओ बनवावा लागेल.
• या व्हिडीओत ३० सेकंदांची जाहिरात चालविली जाईल.
• जर आपल्या व्हिडिओची लांबी तीन मिनिटे किंवा त्याहून अधिक असेल तर त्यामध्ये ४५ सेकंदांची जाहिरात दर्शविली जाईल.
• कमाईची संधी केवळ तीन मिनिटे किंवा त्यापेक्षा अधिक व्हिडिओंवर उपलब्ध असेल.
• एका मिनिटाच्या व्हिडिओमधून कोणतीही कमाई होणार नाही.
• व्हिडिओमध्ये जाहिराती मिळविण्यासाठी, व्हिडिओंवर व्ह्यूज असणे आवश्यक आहे. जाहिरात पात्रतेसाठी प्रत्येक व्हिडिओला किमान ६,००,००० लोकांनी पाहण्याची आवश्यकता आहे.